इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या काळात जगभरात सर्वाधिक लोकप्रिय गोष्ट चहा आहे, जगातील अनेक देशामध्ये चहा हे आवडते पेय मानले जाते. इतकेच नव्हे तर काही नागरिकांना चहा हे व्यसनासारखे आहे. भारतात देखील सकाळची पहिली गोष्ट म्हणजे चहा होय. विशेष म्हणजे काही जण बेड टी पितात, त्यांना डोळे उघडताच अंथरुणावर चहा आवश्यक वाटतो.
काही जणांना चहा न मिळाल्याने डोकेदुखी, थकवा आणि इतर समस्या सुरू होतात. चहाचे व्यसन कधी-कधी नुकसान करते, पण त्याचे काही सकारात्मक आणि फायदेशीर परिणामही होतात. पण या चहाचे अन्य काही फायदे आहेत. प्रत्येक घरातील लोकांच्या सकाळची सुरूवात चहानेच होते. चहा, कॉफी घ्यायला आवडत नाही असे मोजकेच जण असतात. रोज चहा गाळल्यानंतर वापरलेली चहा पावडर फेकून दिली जाते. पण तुम्हाला माहीत आहे ही वापरलेली चहा पावडर रोजची कामे सोपी करू शकते. निरूपयोगी समजून चहा गाळल्यानंतर पावडर आपण फेकून देतो. या लेखात तुम्हाला चहा पावडरचा वापर वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल. याबद्दल
जाणून घेणे आवश्यक आहे.
आपल्या घराच्या कोणत्याही भागात जास्त वास येत असेल किंवा पावसाळ्यात ओलसरपणाची समस्या जास्त त्रास देत असेल तर तुम्ही वापरलेली चहाची पाने वापरू शकता. चहाची भुकटी किंवा पाने खूप चांगली डिओडरायझर म्हणून काम करू शकतात. सर्वप्रथम, एका प्लेटमध्ये किचन टिश्यू टाकून ओल्या चहाची पाने वाळवा. ते चांगले सुकल्यावर मलमल किंवा सुती कापडात बांधून ठेवा. आता या पिशवीत सुगंधी तेलाचे काही थेंब टाका. जिथे वास येतो तिथे ठेवा.
वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. तसेच उरलेली चहाची पाने घर स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता कारण ते कोणत्याही पृष्ठभागावरील चिकटपणा काढून टाकण्यासाठी खूप चांगले आहे. सर्व प्रथम ती पानं कोरडी करा. त्यानंतर चॉपिंग बोर्ड, घाणेरडी भांडी, खिडक्या इत्यादी… जे काही साफ करायचे असेल तिथे वापरा आणि कापडाने किंवा स्क्रबरने घासून घ्या. भांडी साफ करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो.
चहा पावडर किंवा पानांचा वापर बागकामासाठीही करता येतो. यामुळे चांगले खत बनवता येऊ शकते. चहाच्या पानांनी चांगले फर्टिलायजर बनवता येऊ शकते. फक्त चहा बनवताना तुम्ही जास्त साखर घातली असेल तर ते झाडांच्या मुळांना नुकसान पोहोचवू शकते. वापरलेली चहाची भुकटी त्यात साखर नसेल तर वाळवून रोपांच्या मातीजवळ ठेवा, तण वाचवण्यास मदत होते. जर तुम्हाला कंपोस्ट बनवण्याची आवड असेल तर याचा वापर करता येईल. उकळलेल्या चहाचे पाणी थंड करून झाडांना देता येते. त्यामुळे झांडाची वाढ चांगली होऊ शकते.
Tea Powder Leaves Useful Tips Reuse