मुंबई – चहाचे नाव घेतले तरी अनेकांना लगेच तो हवा असतो. काहींना चहाची तलब येते तर काहींना दिवसातून चारवेळा चहा लागतो. कुणी वजन कमी करण्यासाठी तहा पितो तर कुणी एनर्जी बुस्टर म्हणून चहा घेतो. काही लोक चिंता, ताण आणि डोकेदुखी दूर करण्यासाठी चहाला तर टॉनिक समजतात. चहाच्या संदर्भात अनेक समजुती, गैरसमजुती आहेत. पण चहाचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेऊया…
ग्रीन टी – वजनावर नियंत्रण
ग्रीन टी घेतल्याने वजन कमी होते, असा गैरसमज लोकांमध्ये आहे. पण मुळात वजन कमी होत नाही, तर वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये असलेला कॅटेचीन मेटॅबॉलिझम वाढवून फॅट्स बर्न करण्यास मदत करते. मात्र त्याचा अर्ज ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते, असे मुळीच नाही. २-३ कप ग्रीन टीसोबत डायट आणि व्यायामावरही लक्ष द्यावे लागेल.
दुधाचा चहा
दुधाचा चहा घेतल्याने शरीराला नुकसान होते, असा समज लोकांमध्ये आहे. मात्र तसे मुळीच नसून उलट चहात दूध मिसळ्याने शरीराला कॅल्शीयम मिळते. कॅल्शीयम हाडांना बळकटी देते. अर्थात दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा प्यायला नको, हेही तेवढेच खरे.
कॅफीन फ्री हर्बल टी
हर्बल टी कॅफीन फ्री असतो, असे अनेकांना वाटते. हा चहा जडीबुटी, बिया, झाडांच्या सालांपासून आणि फुलांपासून तयार केला जातो. मात्र तो कॅफीन फ्रीन नसतो. त्यामुळे विकत घेताना त्याचे लेबल नक्की तपासून घ्या.
चहा एक्स्पायरी
चहाची एक्स्पायरी डेट नसते आणि तो वर्षानुवर्षे वापरता येतो, असे तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. इतर खाण्याच्या पदार्थांप्रमाणेच चहाचीही एक्स्पायरी डेट असते. चहाचा गंध गेला की समजा त्याची मदत संपली आहे.