चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावर कंटेनरचे कुलूप तोडून त्यातून चहाच्या ९ लाख ७२ रुपये किंमतीच्या १४२ चहाच्या बॅग चोरुन नेल्याची घटना घडली. चांदवड जवळ हॉटेल लगत चहा पावडर घेऊन नाशिकच्या दिशेने जात असलेला एक कंटेनर थांबलेला असतांना अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केली. या चोरीप्रकरणी चांदवड पोलिस स्थानकात ट्रक चालकाने तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक तापास करीत आहे.