मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
आजच्या काळात जगभरात सर्वाधिक लोकप्रिय गोष्ट चहा आहे, जगातील अनेक देशामध्ये चहा हे आवडते पेय मानले जाते. इतकेच नव्हे तर काही नागरिकांना चहा हे व्यसनासारखे आहे. भारतात देखील सकाळची पहिली गोष्ट म्हणजे चहा होय. विशेष म्हणजे काही जण बेड टी पितात, त्यांना डोळे उघडताच अंथरुणावर चहा आवश्यक वाटतो.
काही जणांना चहा न मिळाल्याने डोकेदुखी, थकवा आणि इतर समस्या सुरू होतात. चहाचे व्यसन कधी-कधी नुकसान करते, पण त्याचे काही सकारात्मक आणि फायदेशीर परिणामही होतात. पण त्याचा फायदा अनेकवेळा पिऊनच मिळत नाही तर इतर मार्गांनीही वापरला जातो. जाणून घ्या चहाचे अन्य काही फायदे…
चेहरा
अनेक वेगवेगळ्या हर्बल टी आहेत आणि प्रत्येक चहाचा आपल्या त्वचेवर वेगळा प्रभाव पडतो. काही प्रकारच्या चहामध्ये तुरट चवीचा प्रभाव असतो, तर इतर जळजळ रोखतात. म्हणूनच कोणत्याही कृत्रिम घटकांशिवाय बनवलेला चहा फेशियल टोनर म्हणून वापरता येतो.
केस
चहाचे द्रव्य हे केसांसाठी सौंदर्य वाढवणारा आहे कारण त्याचे अनेक सकारात्मक परिणाम आहेत. टाळू आणि केसांमध्ये मसाज केल्याने टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
डोळे
चहामुळे डोळ्यांच्या समस्यांपासून सुटका मिळते. आयब्राइट चहा, ज्याला युफ्रेशिया देखील म्हणतात, यामध्ये फायदा होतो. आयब्राइटचा वेदनाशामक प्रभाव असू शकतो आणि म्हणूनच डोळ्यांना आराम देण्यासाठी वापरला जातो.
आय ब्राइट चहा हा पिऊ शकता किंवा थेट डोळ्यांवर वापरू शकता. डोळ्यांना त्रास देणारे सूक्ष्म कण काढून टाकण्यासाठी कॉफी फिल्टरने चहा गाळून घ्या. नंतर एक निर्जंतुकीकरण पॅड थंड चहामध्ये बुडवा आणि आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा.
त्वचा
ग्रीन टीमध्ये अनेक घटक असतात जे आपल्या त्वचेसाठी चांगले असतात. आपल्या त्वचेसाठी घरच्या घरी पीलर बनवणे खूप सोपे आहे. यासाठी ग्रीन टी, मध, ऑलिव्ह ऑईल आणि दाणेदार साखर वापरा. ग्रीन टी, मध आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र मिसळा. स्क्रब सारखे होईपर्यंत पुरेशी साखर घाला. स्वच्छ त्वचेवर लावा, हलक्या हाताने चोळा आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.