नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने टीडीएस तरतुदीबाबत नवे दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, या प्रकारचे फायदे रोख, वस्तू किंवा अंशतः होऊ शकतात. त्याशिवाय टीडीएस भरणाऱ्या करदात्यांना प्राप्तकर्त्यांची करआकारणी तपासण्याची गरज नाही. तसेच नफा किंवा परवानगी म्हणून दिलेल्या मालमत्तेचे स्वरूप संबंधित नाही. त्याशिवाय भांडवली मालमत्ता कलम १९४ आर अंतर्गत येणार आहे. हे कलम सवलतीशिवाय कार, टीव्ही, कॉम्प्युटर, सोन्याचे नाणे, स्मार्टफोन, प्रवास, मोफत तिकीट आणि औषधांचे नमुने यासारख्या रोख किंवा वस्तूच्या रूपाने प्रोत्साहन देणाऱ्या विक्रेत्यांवर लागू होणार आहे.
नवी तरतूद १ जुलै २०२२ पासून लागू होणार आहे. त्यापूर्वी कर महसूल गळतीच्या चौकशीसाठी अशा प्राप्तीकर स्रोतांवर टीडीएसची तरतूद २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आली आहे. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात प्राप्तीकर अधिनियम १९४ आर मध्ये नवे कलम लागू करण्यात आले आहे. ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीकडून १० टक्के दराने स्रोतावर कर वजा करणे आवश्यक आहे. त्याशिवाय १९४ आर हे कलम रुग्णालयातील मोफत नमुना वितरणावर लागू होईल. नियोक्ता म्हणून रुग्णालय अशा नमुन्यांना कर्मचाऱ्यांसाठी करपात्र अनुज्ञेय म्हणून हाताळू शकते.
टीडीएस म्हणजे आपल्या उत्पन्नाच्या स्रोतावरील करकपात होय. विविध संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनातून कर म्हणून काही रक्कम कपात करतात.त्यालाच आपण टीडीएस असे म्हणतो. तथापि सर्व नोकरदारांचे टीडीएस कपात होत नाही. टीडीएस यंत्रणेत पेमेंट देणाऱ्या कंपन्या वेतन देण्यापूर्वीच कर कपात करतात. त्यानंतर उर्वरित रक्कम कर्मचाऱ्यांना वेतन म्हणून दिली जाते.
टीडीएस ऑनलाइन असा तपासावा
१) सर्वप्रथम https://www.incometax.gov.in/iec/fopotal वर जाऊन Register हा पर्याय निवडा.
२) पॅनकार्डमध्ये नोंदवलेल्या तपशीलाच्या आधारावर माहिती नोंदवा आणि पासवर्ड जनरेट करा.
३) यूजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून अकाउंटमध्ये लॉगिन करा.
४) लॉगिन केल्यानंतर व्ह्यू टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट (२६एएस) हा पर्याव निवडा.
५) आता तुम्ही TRACES या दुसऱ्या संकेतस्थळावर पोहोचताल.
६) येथे तुम्हाला टीडीएसशी संबंधित सगळी माहिती मिळेल.