इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तरुणाईमध्ये टॅटूची क्रेझ मोठी आहे. टॅटू हा एक फॅशनचा भाग मानला जातो. त्यामुळे आपल्याकडे अनेकांना टॅटू गोंदवणे आवडू लागले आहे. काही असले तरी अशा पद्धतीने टॅटू काढताना काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर काय घडू शकते हे वरच्या घटनेवरुन पुढे आलेच आहे. त्यामुळे केवळ ही घटना घडली म्हणूनच नव्हे तर टॅटू काढताना नेहमीच काळजी घ्यायला हवी
उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये स्वस्तात टॅटू काढून घेणं १४ जणांच्या चांगलच अंगलट आलं आहे. टॅटू काढताना एकच सूई वापरल्यामुळे १४ जणांना एचआयव्हीची (HIV) लागण झाली आहे. या घटनेनंतर स्वस्त पार्लरमधून टॅटू काढून घेण्याबाबत अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
पंडित दिन दयाल रुग्णालयातील वाराणसी येथील एका घटनेने अवघे उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणात देशातही खळबळ उडाली आहे. ही खळबळ उडण्याचे कारण असे की, सुमारे 14 जणांनी आपल्या अंगावर टॅटू गोंदवला त्यांची ही फॅशन त्यांना महागात पडली आहे. ज्यामुळे त्यांना एचआयव्ही (HIV) या विषाणूची लागण झाली आहे. होय, डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. सांगितले जात आहे की, या 14 जणांनी एकाच ठिकाणाहून टॅटू गोदवून घेतला होता.
ज्या व्यक्तीने त्यांना टॅटू गोंदवला त्याने निष्काळजीपणे एकच सूई सर्वांचे टॅटू काढताना वापरली होती. अँटी रेट्रो व्हायरल ट्रीटमेंट सेंटरच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोकांनी नुकताच आपल्या शरीरावर टॅटू गोंदवला होता. टॅटू गोंदवल्यानंर हे सर्व जण सुरुवातीला किरकोळ आजारी पडले.
पुढे हे आजारपण वाढत गेले. त्यांना सर्दी,ताप, थंडी खोकला अशी लक्षणे दिसू लागली. त्यांनी वैद्यकीय उपचार केले. मात्र, कोणताच फरक पडत नव्हता. त्यांचे वजनही मोठ्या झपाट्याने कमी होत होते. डॉक्टरांनी त्यांची रक्ततपासणी केली असता त्यांना एचआयव्ही विषाणूची लागण झाल्याचे पुढे आले. एकाच वेळी इतक्या लोकांना आणि समान लक्षणांनी एचआयव्ही लागण झाल्याचे पुढे आल्याने डॉक्टरांनी अधिक चौकशी केली. या चौकशीत पुढे आले की, सर्वांनी एकाच ठिकाणी जाऊन टॅटू गोंदवले होते. हा टॅटू गोंदवताना कोणत्याही प्रकारे काळजी घेण्यात आली नव्हती. सूईसुद्धा बदलण्यात आली नव्हती. परिणामी एकाच वेळी सर्वांना ही लागण झाली.
टॅटू काढल्यानंतर या सर्व जणांना अचानक ताप आला. सुरुवातीला त्यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काही आढळून आले नाही. त्यानंतर त्यांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर या सगळ्यांना एचआयव्हीची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. या १४ जणांनी कोणतेही लैंगिक संबंध ठेवले नव्हेत किंवा कोणत्याही एचआयव्ही बाधित रुग्णाचे रक्त त्यांना चढवण्यात आले नव्हते. एका स्वस्त पार्लरमधून टॅटू काढून घेतला होता. त्याने टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता.
Tatoo 14 Peoples HIV Aids Infection Test Positive