मुंबई – कॉम्पॅक्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) हे दणकट वाहन भारतीय बाजारात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. कमी खर्च, उत्तम कामगिरी आणि स्पोर्टी लूकमुळे ग्राहक अशी वाहने निवडत आहेत. सध्या मारुतीची ब्रेझा ही कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये आहे. परंतु जुलै महिन्यात टाटा मोटर्सची एसयूव्ही टाटा नेक्सनने चमकदार कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
वाहन विक्रीच्या बाबतही टाटा नेक्सनने मारुती ब्रेझ्झा नंतर दुसरे स्थान पटकावले आहे. इतकेच नाही तर या एसयूव्हीने विक्रीमध्ये ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट सारख्या मॉडेल्सला मागे टाकले आहे. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी जुलै महिन्यात या एसयूव्हीच्या एकूण १० हजार २८७ वाहनांची विक्री केली असून गेल्या वर्षी जुलै महिन्यात ४ हजार ३२७ वाहनाच्या तुलनेत १३८ टक्के वाढ आहे.
टाटा मोटर्सने एका महिन्यात १० हजारहून अधिक नेक्सॉन मॉडेल्सची विक्री करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग असलेली ही देशातील सर्वात सुरक्षित एसयूव्ही गाडी आहे. पहिल्या स्थानावरील मारुती ब्रेझाच्या एकूण १२ हजार ६७६ वाहनांची विक्री झाली असून गेल्या वर्षी जुलै महिन्यात ७ हजार ८०७ युनिट होती.
टाटा नेक्सन बाजारात एकूण दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. यात १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून १२० पीएस पॉवर आणि १७९ एनएम टॉर्क निर्माण करते. सदर इंजिन ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देण्यात येते. पेट्रोल आणि डिझेल प्रमाणेच ही कार इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
एसयूव्ही सुरक्षेच्या दृष्टीने देखील खूप खास आहे, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, रियर पार्किंग सेन्सर्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी), आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकरसारखी वैशिष्ट्ये आहेत. सदर वाहनामध्ये पेट्रोल प्रकारांची किंमत ७.१९ लाख ते ११.८९ लाख रुपयांदरम्यान आहे. त्याच वेळी, डिझेल वाहन प्रकारांची किंमत ९.४८ लाख ते १३.२३ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.