इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जागतिक दर्जाचे शहर म्हटले की, आपल्यासमोर न्यूयॉर्क, लंडन, टोकियो पॅरिस अशी मोचकीच ही शहरे उभी राहतात. त्यानंतर भारताचा विचार केल्यास मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता ही शहरे डोळ्यासमोर येतात. परंतु खऱ्या अर्थाने भारतात जागतिक दर्जाची आणखी शहरे निर्माण व्हायला हवीत, यासाठी टाटा स्टील समूह प्रयत्नशील आहे. जमशेदपूर या शहराला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी टाटा स्टीलने पुढाकार घेतला आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा स्टील जमशेदपूरला जागतिक दर्जाचे डिजिटल शहर बनवेल. कंपनीकडे अतिशय उत्साही, गतिमान आणि चांगल्या अर्थाने काम करणारे कर्मचारी आहेत. हे कार्यप्रदर्शन आणि आकांक्षा यांचे सुंदर मिश्रण असून त्यातून चांगले कार्य घडेल.
एन चंद्रशेखरन हे पोस्टल पार्क, बिस्तुपूर येथे संस्थापक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. तत्पूर्वी, अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी जेएन टाटा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. चंद्रशेखरन यांनी जेएन टाटा यांच्या 183 व्या जयंतीनिमित्त शहराचा विकास आराखडा रहिवाशांना सादर केला. लोहनगरीला राष्ट्रीय बेंचमार्क बनवण्यात टाटा स्टीलचे योगदान अधोरेखित करून ते म्हणाले की, टाटा समूहातर्फे टाऊन स्ट्रीम व्यवसायात शहरात गुंतवणूक केली जात आहे. याची ठळक उदाहरणे म्हणजे तनिष्क, बिग बास्केट, वन एमजी, टाटा पॉवरचा सोलर प्लांट होय. तसेच अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, टाटा स्टील कडून या शहराला शाश्वतता, व्यवसायातील सुलभता, डिजिटल क्षेत्रात जागतिक दर्जाचे शहर बनवायचे आहे. उत्पादन आणि आर्थिक कामगिरीच्या बाबतीत टाटा स्टीलची आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे उद्देशाने कार्य करते आणि प्रत्येक वेळी समाजासाठी काहीतरी करण्याची गरज असताना हात पुढे करण्यास ते कमी पडत नाही. टाटा समूह मुख्यत्वे टाटा स्टीलसाठी वचनबद्ध आहे. पुढील दशकात 40 दशलक्ष टन उत्पादन करण्याचे टाटा स्टीलचे उद्दिष्ट आहे.
शहरातील रहिवाशांच्या योगदानाचा संदर्भ देत चंद्रशेखरन म्हणाले की, जमशेदपूरचे नागरिक नेहमीच टाटा स्टील आणि टाटा समूहाला पाठिंबा देत आहेत. कोविड कालावधीत लोकांनी ज्या प्रकारे एकत्र काम केले ते आमच्या संस्थापकाने समूहात प्रदीर्घ काळापासून स्थापित केलेल्या श्रेष्ठ मूल्य प्रणालीचा पुरावा आहे. कोविड महामारीच्या काळात परिचारिका, डॉक्टर, सफाई कामगार, टाटा स्टीलचे कर्मचारी आणि शहरातील रहिवासी यांच्या सहकार्यामुळे कंपनीच्या उत्पादनावर कधीही परिणाम झाला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात ऑक्सिजनसाठी हाहाकार माजला होता, त्यामुळे टाटा स्टील आणि टाटा समूहाने या टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. टाटा स्टीलने परदेशातून आयात केलेले क्रायोजेनिक वैद्यकीय सिलेंडर पुरविण्यात तसेच रुग्णालये, आयसोलेशन वॉर्ड, लसीकरणात खाटा वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी रहिवाशांसह जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारचे कौतुक करत त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. यावेळी कंपनीचे अधिकारी आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते.