रविवार, ऑगस्ट 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टाटा सफारीला २७ वर्षे पूर्ण; एक्‍सक्‍लुसिव्‍ह ‘स्‍टील्‍थ एडिशन’ लाँच केले

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 22, 2025 | 3:19 pm
in संमिश्र वार्ता
0
Harrier Safari STEALTH KV

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टाटा मोटर्स ही भारतातील आघाडीची एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनी टाटा सफारीची २७ आयकॉनिक वर्षे अभिमानाने साजरी करत आहे, जेथे लक्‍झरी, क्षमता व विशिष्‍टतेची साहसी व अत्‍याधुनिक प्रतीक असलेली एक्‍सक्‍लुसिव्‍ह लिमिटेड स्‍टील्‍थ एडिशन लाँच करण्‍यात आली आहे. फक्‍त २,७०० युनिट्स असलेली ही प्रीमियम एडिशन हॅरियर व सफारीमध्‍ये उपलब्‍ध असेल, जी विशिष्टता आणि सर्वोत्तम एसयूव्‍ही आकर्षकतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल. स्‍लीक, मोनोटोन फिनिशसह ही स्‍टील्‍थ लाइनअप हवीहवीशी वाटते, तसेच अद्वितीय वेईकलचे मालक बनण्‍याच्या सर्वसमावेशक ग्राहक पसंतींना दाखवते. विक्रीसाठी काही युनिट्स उपलब्‍ध असून स्‍टील्‍थ एडिशनसाठी बुकिंग्‍जना आजपासून ऑनलाइन आणि देशभरातील कंपनीच्‍या डिलरशिप्‍समध्‍ये सुरूवात होत आहे.

स्‍टील्‍थ एडिशनचा लुक नवीन स्‍टील्‍थ मॅट ब्‍लॅक फिशसह अधिक आकर्षक करण्‍यात आला आहे, जी रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. डिझाइन स्‍टेटमेंटसह या एडिशनमधून प्रभुत्‍व व विशिष्‍टता दिसून येते, तसेच ती उत्‍साही आभा देते, जी रस्‍त्‍यावर या वेईकलला इतरांपेक्षा वरचढ ठरवते. मॅट कार पेंट अद्वितीय, स्‍टायलिश फिनिश देते, एसयूव्‍हीच्‍या विशिष्‍ट आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करते. यामधील नॉन-रिफ्लेक्टिव्‍ह पृष्‍ठभाग वेईकलला अत्‍याधुनिक, आकर्षक लुक देते, एसयूव्‍हीच्‍या बॉडी लाइन्‍स व कॉन्‍चर्सना आकर्षक बनवते, ज्‍यामुळे वेईकल प्रीमियम दिसते. सर्वोत्तम शीन प्रखर सूर्यप्रकाशामध्‍ये ग्‍लेअर कमी करते, ज्‍यामधून कोणत्‍याही प्रकाशामध्‍ये वेईकलचा आकर्षक स्‍टान्‍स दिसून येतो. हॅरियर स्‍टील्‍थसाठी २५.०९ लाख रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) आणि ६ आणि ७ सीटर दोन्हीमध्ये उपलब्ध सफारी स्‍टील्‍थसाठी २५.७४ लाख रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) किंमत असलेल्‍या या लिमिटेड एडिशन एसयूव्‍हींमध्‍ये प्रतिष्‍ठा, कार्यक्षमता व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे विनासायास एकत्रिकरण आहे, ज्‍यामुळे या एसयूव्‍ही सर्वोत्तमतेच्‍या अद्वितीय प्रतीक आहेत.

हॅरियर व सफारीचे हे उत्‍साहवर्धक नवीन एडिशन लाँच करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. वि‍वेक श्रीवत्‍स म्‍हणाले, “टाटा मोटर्स दीर्घकाळपासून भारतातील एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये अग्रस्‍थानी आहे, जेथे कंपनीच्‍या डीएनएमध्‍ये नाविन्‍यता रूजलेली आहे. भारतातील बाजारपेठेत लाइफस्‍टाइल एसयूव्‍हीची संकल्‍पना सादर केलेल्‍या टाटा सफारीमधून अग्रगण्‍य सर्वोत्तमतेचा हा उत्‍साह दिसून येतो. अद्वितीय वारसाच्‍या २७ वर्षांसह टाटा सफारी सतत विकसित झाली आहे आणि लाँच करण्‍यात आलेली स्‍टील्‍थ एडिशन या वारसाला मानवंदना आहे. ही स्‍पेशल एडिशन प्रीमियम, एक्‍सक्‍लुसिव्‍ह असून अद्वितीय स्‍टील्‍थ मॅट ब्‍लॅक फिनिशचे फक्‍त २,७०० युनिट्स उपलब्‍ध आहेत. स्‍टील्‍थ एडिशन एसयूव्‍हीपेक्षा अधिक असून प्रतिष्‍ठा, साहस व क्षमतेचे प्रतीक आहे, जी महत्त्वाकांक्षी संग्रहकाच्‍या कारमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करेल आणि उत्‍साही व जाणकारांना आवडेल. स्‍टील्‍थ एडिशनचे मालक बनणे म्‍हणजे अपवादात्‍मक कार खरेदी करण्‍यासोबत ऑटोमोटिव्‍ह वारसाचा भाग बनण्‍यासारखे आहे, जेथे प्रत्‍येकजण त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या कारचे कौतुक करतील.”

टाटा हॅरियर आणि सफारी स्‍टील्‍थ एडिशनची वैशिष्ट्ये:
दिग्‍गज लँड रोव्‍हर डी८ प्‍लॅटफॉर्ममधून संचालित शक्तिशाली ओएमईजीएआरसी प्‍लॅटफॉर्मवर डिझाइन करण्‍यात आलेल्‍या हॅरियर व सफारी स्‍टील्‍थ एडिशनमध्‍ये डिझाइन, कार्यक्षमता आणि प्रगत तंत्रज्ञानाचे लक्षवेधक संयोजन आहे. या वेईकलमधील विशेष स्‍टील्‍थ मॅट ब्‍लॅक फिनिश, आर१९ ब्‍लॅक अलॉई व्‍हील्‍स आणि स्‍टील्‍थ मॅस्‍कट वेईकलची आकर्षकता व लक्षवेधक उपस्थितीमध्‍ये अधिक भर करतात. आतील बाजूस कार्बन-नॉईर थीममधील (सफारीमध्‍ये फक्‍त दुसऱ्या रांगेत) पहिल्‍या व दुसऱ्या रांगेत हवेशीर सीट्स, वॉईस-असिस्‍टेड ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल सिस्‍टम आहे, ज्‍यामधून प्रीमियम आरामदायीपणाची खात्री मिळते. तंत्रज्ञानाला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले आहे, जेथे ३१.२४ सेमी हार्मन टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, मनोरंजनासाठी अर्केड अॅप स्‍टोअर, रिमोट कनेक्‍टसाठी अॅलेक्‍सा होम २ कार, नेव्हिगेशनसाठी इनबिल्‍ट मॅय माय इंडिया, २६.०३ सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्‍लस्‍टर आणि सर्वोत्तम जेबीएल १०-स्‍पीकर ऑडिओ सिस्‍टमसह हार्मन ऑडिओवॉरएक्‍स, स्‍लायडिंग आर्म-रेस्‍ट व स्प्रिंकलर नोजल अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. या एडिशनमध्‍ये क्रियोटेक २.० लिटर बीएस-६ फेज २ टर्बोचार्ज्‍ड इंजिन आहे, जे उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभवासाठी ६-स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशनच्‍या माध्‍यमातून १७० पीएस शक्‍ती देते. सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देत स्‍टील्‍थ एडिशनमध्‍ये लेव्‍हल २+ एडीएएससह २१ कार्यक्षमता, तसेच इंटेलिजण्‍ट स्‍पीड असिस्‍ट फिचर (फर्स्‍ट टाइम इन सेगमेंट), ७ एअरबॅग्‍ज आणि ईएसपीसह १७ सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे ही तिच्‍या श्रेणीमधील सर्वात सुरक्षित एसयूव्‍ही आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धमकी दिल्याने २२ वर्षीय तरूणाने केली आत्महत्या..

Next Post

नाशिक मनपा आयुक्तांविरोधात या कारणामुळे शिवसेना महानगरप्रमुख यांची थेट उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
NMC Nashik 1

नाशिक मनपा आयुक्तांविरोधात या कारणामुळे शिवसेना महानगरप्रमुख यांची थेट उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार….

ताज्या बातम्या

Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
unnamed 6

नाशिक जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात…विरल आणि अन्यना यांची उत्तम कामगिरी

ऑगस्ट 3, 2025
crime 12

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 3, 2025
image0037LA4 e1754183811326

जळगावात जमले भारताचे भावी बुद्धिबळपटू: ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

ऑगस्ट 3, 2025
IMG 20250802 WA0467 e1754183550323

मठाच्या माधुरी हत्तीणी स्थलांतराबाबत वनताराने केली आपली भूमिका स्पष्ट….

ऑगस्ट 3, 2025
3 1024x683 1

दीडशे दिवस उपक्रमात होणार अनुकंपाच्या सर्व पदांची भरती…अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आरडीसी

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011