मुंबई – देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त ‘मायक्रो एसयूव्ही टाटा पंच’ ही कार देशांतर्गत बाजारात सादर केली आहे. विशेष म्हणजे या एसयूव्ही कारचे अधिकृत बुकिंग देखील आज म्हणजेच ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. ही कार मायक्रो एसयूव्ही व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे देशात लाँच करण्यात आली. विशेष म्हणजे, या कारची किंमत सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आहे.
नवीन टाटा पंच कार लाँच करण्यापूर्वी कंपनीने त्याच्याशी संबंधित सर्व माहिती वेळोवेळी टीझरद्वारे शेअर केली आहे. यात एसयूव्हीचा मागील भाग म्हणजेच बूट स्पेस दाखवण्यात आला आहे. ही एसयूव्ही रेन सेन्सिंग वायपरसह येत आहे. ही कार ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच अधिकृत डीलरशिपद्वारे बुक करू शकतात. टाटा पंच फक्त एक इंजिनसह ऑफर केली जाणार असून त्यामध्ये 1.2 लिटर क्षमतेचे नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इनलाइन इंजिन असेल. तसेच हे इंजिन 86 PS ची पॉवर आणि 113 Nm ची टॉर्क जनरेट करते. यात दोन ड्रायव्हिंग मोड्स (इको आणि सिटी) देखील मिळतात.
टाटा पंच कारच्या स्वयंचलित व्हेरिएंटला ट्रॅक्शन प्रो मोड देखील मिळेल, त्यामुळे ड्रायव्हरला इन्फोटेनमेंट स्क्रीनद्वारे चिखल किंवा इतर खराब रस्त्यांविषयी माहिती दिली जाईल. एसयूव्हीला ‘डायना प्रो टेक्नॉलॉजी’ देखील मिळते, इंजिन स्टार्ट आणि स्टॉप टेक्नॉलॉजी, ब्रेक स्वे कंट्रोल आणि फॉग दिवे (कॉर्नरिंग फंक्शनसह) देखील या वाहनात दिले जातील.
ग्राहकांना अवघ्या २१ हजार रुपयांमध्ये या कारचे बुकींग करता येणार आहे. हे बुकींग ऑनलाईनरित्या तसेच डिलरकडेही करता येणार आहे. कारची किंमत ५ ते ८ लाखांच्या दरम्यान असणार आहे.
https://twitter.com/TataMotors_Cars/status/1444907472372711424