इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील वाहननिर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध आणि अग्रगण्य कंपनी टाटा मोटर्सतर्फे बहुप्रतीक्षित अल्ट्रोज ड्युअल क्लच ऑटोमॅटिक (डीसीए) कारचे अनावरण करण्यात आले आहे. या कारची प्राथमिक किंमत ८.१ लाख रुपये आहे. टाटा अल्ट्रोज (ALTROZ DCA) ही प्रगत ड्युअल क्लच ट्रान्समिशन कार आहे. भारतातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून या कारची रचना करण्यात आली आहे. या कारमध्ये ALTROZ DCA 45 या पेटंटचे नवीन तंत्रज्ञान आणि प्लॅनेटरी गेअर सिस्टिमसह जगातील पहिल्या ड्युअल क्लच ट्रान्समिशनचा (डीसीए) समावेश आहे. मारुती सुझुकीच्या बलेनो या कारशी या कारची स्पर्धा होणार आहे.
या कारमध्ये तुम्हाला अॅक्टिव्ह कुलिंग तंत्रज्ञानासह वेट क्लच, मशीन लर्निंग, शिफ्ट बाय वायर तंत्रज्ञान, सेल्फ हिलिंग मॅकेनिजम आणि ऑटो पार्क लॉक सिस्टिम पाहायला मिळणार आहे. ALTROZ DCA कारला १.२ लिटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन जोडले जाणार आहे. हे इंजिन XM+, XT, XZ आणि XZ+ या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे.
अल्ट्रोज डीसीए ही कारमध्ये अनेक विशेष फिचर्स आहेत. ALTROZ DCA कारचे नवीन ओपेरा ब्लू रंगात अनावरण करण्यात आले आहे. तसेच ही कार डाउनटाउन रेड, आर्केड ग्रे, एव्हेन्यू, व्हाइट, हार्बर ब्लू या रंगसंगतीतही मिळणार आहे.
कारच्या फिचर्समध्ये प्रीमियम लेदर सीट्स, ऑटो हेडलँप्स, हरमन ७ इंचाचा टचस्क्रिन, ७ इंचाचे टीएफटी डिजिटल क्लस्टर, रियर एसी वेंट आणि आयआरए कनेक्टेड कार तंत्रज्ञानासारख्या फिचर्सचा समावेश आहे.
या कारला नव्या ६ स्पीड ड्युअर क्लच गिअरबॉक्स फक्त १.२ लिटर, तीन सिलिंडर, नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात येत आहे. या इंजिनमध्ये ८६ एचपी आणि ११३ एनएम पीक टॉर्क निर्मिती करतो. तो मॅन्युअल व्हेरिएंटच्या तुलनेत जवळपास २० किलो जड आहे.