गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

by Gautam Sancheti
जून 24, 2025 | 7:22 pm
in संमिश्र वार्ता
0
Image – Harrier.ev

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या चार-चाकी इव्ही उत्पादकाने आज भारतात बनलेल्या सर्वात दमदार एसयूव्ही हॅरियर.इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची घोषणा केली. केवळ या उद्योगातच नाही, तर जगात नवीन असलेली इनोव्हेशन्स आणि बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटीसह सुलभ मालकी प्रदान करण्याबाबतची कंपनीची वचनबद्धता दर्शविणाऱ्या हॅरियर.इव्हीने केवळ आपली विश्वासार्हता मजबूत केलेली नाही, तर सुपर-कार सारखा परफॉर्मन्स, कुठेही घेऊन जाऊ शकणारी ऑफ-रोड क्षमता, आकर्षक टेक्नॉलॉजी आणि आलीशान आरामदायकता प्रदर्शित करून भविष्याची अल्टीमेट एसयूव्ही म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे.

२ जुलै पासून हॅरियर.इव्हीचे बुकिंग सुरू होत आहे. रियर-व्हील ड्राइव्ह (आरडब्ल्यूडी) द्वारा संचालित प्रकारासाठीच्या प्रारंभिक किंमती २१.४९ लाखांपासून सुरु होत आहेत. हॅरियर.इव्ही अॅडव्हेंचर ६५ची किंमत २१.४९ लाख रुपये, अॅडव्हेंचर एस ६५ ची किंमत २१.९९ लाख रुपये, फियरलेस+ ६५ ची किंमत २३.९९ लाख रुपये, फियरलेस+ ७५ ची किंमत २४.९९ लाख रुपये आणि एम्पॉवर्ड ७५ ची किंमत २७.४९ लाख आहे.

हॅरियर.इव्हीच्या स्पर्धात्मक किंमती ठेवण्याच्या धोरणाविषयी टिप्पणी करताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवास्तव म्हणाले, “हॅरियर.इव्ही सह एका सुपरकार प्रमाणे बेजोड परफॉर्मन्स देण्याची, कुठेही ऑफ रोड जाण्याची, आलिशान आरामदायकता देण्याची एका एसयूव्हीची खरी क्षमता उघड करण्याची आमची इच्छा आहे. हॅरियर.इव्हीमध्ये लक्षणीय असे काय आहे, तर हे वाहन या सर्वच गोष्टी प्रदान करते आणि तेही आयसीई संचालित वाहनांच्या किंमतीत.आणि परफॉर्मन्स, कार्यक्षमता, टेक्नॉलॉजी आणि सुरक्षा या बाबतीत मात्र हॅरियर.इव्ही आयसीई संचालित वाहनांना मागे टाकते.

आज या वाहनाच्या किंमती जाहीर करताना आम्ही भारतात ई-मोबिलिटीला पुढे घेऊन जाण्याच्या दिशेने एक लक्षणीय पाऊल उचलत आहोत आणि त्याचबरोबर पारंपरिक आयसीई संचालित वाहनांना एक दमदार पर्याय देऊ करत आहोत. आम्हाला खात्री आहे की, हॅरियर.इव्ही एसयूव्ही या उद्योगात एसयूव्हीच्या नवीन युगाची सुरुवात करेल. या युगात वाहनाला शक्ती कुठून मिळते हे नाही, तर वाहन कशी शक्ती प्रदान करते हे महत्त्वाचे असेल.”

हॅरियर.इव्हीची ठळक वैशिष्ट्ये:

  • सुपरकारसारखा परफॉर्मन्स अनुभवा
    o पुढच्या बाजूस १५८ पीएस (११६ केडब्ल्यू)ची ड्युअल मोटर शक्ती आणि मागील बांजून २३८ पीएस (१७५ केडब्ल्यू)
    o ड्युअल मोटर सेटअपमधून ५०४ एनएम टॉर्क
    o ६.३ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास सेगमेन्ट मध्ये सर्वश्रेष्ठ
  • या एसयूव्हीसह कुठेही ऑफ-रोड जाण्याच्या क्षमतेचा आनंद अनुभवा
    o क्वॉड व्हील ड्राइव्ह सिस्टमसह अप्रतिम ऑफ-रोड अनुभव मिळवा
    o सहा टेरेन मोड असल्यावर काहीच अशक्य नाही, यामुळे कुठेही बिनधास्त जाण्याचा विश्वास मिळतो
    o ५४० अंश सराऊंड व्ह्यू सह आसपासचे आणि खालचे देखील बघू शकता
  • सेव्हर इंडल्जंट टेक्नॉलॉजी आणि पूर्वी कधीही नव्हती इतकी आरामदायकता
    o असामान्य हाताळणी आणि चालवण्याच्या कम्फर्टसाठी फ्रिक्वन्सी डिपेन्डन्ट डॅम्पिंगसह अल्ट्रा गाइड सस्पेंशनसह बेजोड आरामदायकता आणि शांती मिळवा
    o जगातील पहिली हरमनची ३६.९ सेमी (१४.५३”) सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट स्क्रीन, जी सॅमसंग निओ क्यूएलईडीद्वारा संचालित आहे. हा जगातील पहिला निओ क्यूएलईडी ऑटोमोटिव्ह डिस्प्ले आहे, यात JBL ऑडिओ मोड आणि डॉल्बी अॅटमॉस सह जेबीएल ब्लॅक १० स्पीकर सिस्टम आहे, जी थिएटरमॅक्स अनुभव देते
    o ई-व्हॅले ऑटो पार्क असिस्ट, डिजी अॅक्सेस डिजिटल की आणि ड्राइव्हपे सह तुमच्या हातात सुविधेचे बळ
  • मालकीच्या मुक्त अनुभवासाठी बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटी दिली आहे (*फक्त प्रथम मालक – खाजगी वैयक्तिक ग्राहकासाठीच)
  • ७५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकचे पाठबळ जे ६२७ किमीची एआरएआय प्रमाणित (पी१ + पी२) रेंज (अंदाजे ४८० किमी – ५०५ किमी सी७५ रेंज) देते
  • १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमी पर्यंत रेंज जोडून जलद चार्जिंग स्पीडचा लाभ मिळवा
    हॅरियर.इव्ही केवळ आपल्या अत्याधुनिक क्षमता प्रदर्शित करत नाही, तर देशात बनणाऱ्या एसयूव्हीसाठी एक नवीन मापदंड स्थापित करते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

Next Post

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी घरामध्ये वादाचे प्रसंग टाळलेले बरे, जाणून घ्या, गुरुवार, २१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 20, 2025
IMG 20250820 WA0386

नाशिक जिल्हा परिषद पंचायत विकास निर्देशांकात राज्यात अव्वल…यांच्या हस्ते होणार गौरव

ऑगस्ट 20, 2025
election 1

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या…सहकार विभागाने घेतला हा निर्णय

ऑगस्ट 20, 2025
fda1

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…मिठाईचा २४ हजाराचा साठा जप्त

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधिक फोटो

कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास

ऑगस्ट 20, 2025
Sale KV Static blue 1x1 copy 1 e1755691438850

फ्लिपकार्टवर पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या विक्रीला सुरूवात…ही आहे किंमत

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011