मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज घोषणा केली की, कंपनी ग्राहकांना त्यांच्या कार आणि एसयूव्हीवर नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा देणार आहेत, जो सुधारित जीएसटी दर लागू होणारी तारीख २२ सप्टेंबर २०२५ पासून मिळेल.
ही घोषणा करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, ”२२ सप्टेंबर २०२५ पासून प्रवासी वाहनांवर लागू होणारी जीएसटी कपात प्रगतीशील आणि वेळेवर घेतलेला निर्णय आहे, जो भारतातील लाखो लोकांसाठी वैयक्तिक वाहतूक अधिक सुलभ करेल. माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, माननीय अर्थमंत्र्यांच्या हेतूनुसार आणि आमच्या ग्राहक-केंद्रित तत्वज्ञानानुसार टाटा मोटर्स जीएसटीमध्ये कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देईल आणि या सुधारणेच्या हेतूचे पूर्णपणे पालन करेल. यामुळे आमच्या लोकप्रिय कार आणि एसयूव्ही श्रेणी सर्व विभागांमध्ये अधिक सहजपणे उपलब्ध होतील, ज्यामुळे पहिल्यांदाच कार खरेदी करणारे ग्राहक सक्षम होतील आणि अधिकाधिक ग्राहकांसाठी नवीन युगातील वाहतूकीकडे वाटचाल वेगवान होईल.”
टाटा मोटर्सच्या कार व एसयूव्हींवरील संभाव्य किमती:
टियागो – जवळपास ७५,००० रूपये
टिगोर -जवळपास ८०,००० रूपये
अल्ट्रोज- जवळपास १,१०,००० रूपये
पंच – जवळपास ८५,००० रूपये
नेक्सॉन- जवळपास १,५५,००० रूपये
कर्व्ह- जवळपास ६५,००० रूपये
हॅरियर- जवळपास १,४०,००० रूपये
सफारी -जवळपास १,४५,००० रूपये