शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

टाटा मोटर्सकडून ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज लाँच….६.८९ लाख रूपये इतक्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध

by Gautam Sancheti
मे 23, 2025 | 5:31 pm
in संमिश्र वार्ता
0
Image 4

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजच्‍या लाँचची घोषणा केली, जिची सुरूवातीची किंमत ६.८९ लाख रूपये आहे. आकर्षक डिझाइन, लक्‍झरीअस इंटीरिअर्स आणि प्रगत वैशिष्‍ट्यांसह प्रीमियमनेसच्‍या नवीन युगामध्‍ये प्रवेश करत ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज लक्ष वेधून घेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, तसेच प्रीमियम डिझाइन, अद्वितीय सुरक्षितता, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि थरारक कार्यक्षमता या मुलभूत आधारस्‍तंभांवर निर्माण करण्‍यात आली आहे. नवीन एक्‍स्‍टीरिअर व लक्‍झरीअस तंत्रज्ञान-संपन्‍न केबिनपासून सुधारित कनेक्‍टीव्‍हीटी आणि विस्‍तारित मल्‍टी-पॉवरट्रेन लाइन-अपपर्यंत – जे आता पहिल्‍यांदाच एएमटी पर्यायामध्‍ये देखील आहे – अल्‍ट्रोज दैनंदिन ड्राइव्‍ह्जना असाधारण प्रवासामध्‍ये बदलण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

अल्‍ट्रोजने प्रीमियम हॅचबॅक विभागामध्‍ये बेंचमार्क म्‍हणून स्‍वत:चा दर्जा स्‍थापित केला आहे. ५-स्‍टार जीएनसीएपी रेटिंग मिळणारी पहिली व तिच्‍या श्रेणीमधील एकमेव असलेल्‍या या कारने सुरूवातीपासून सुरक्षिततेमध्‍ये नवीन मानक स्थापित केले आहेत. या प्रबळ पायाला अधिक दृढ करत ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजने आता प्रीमियमनेसच्‍या आकर्षक नवीन अभिव्‍यक्‍तीसह स्‍तर उंचावला आहे. या कारमध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट डिझाइन घटक आहेत, जसे आकर्षक डोअर हँडल्स व इन्फिनिटी कनेक्‍टेड एलईडी टेल लॅम्‍प्‍स, तसेच ल्‍युमिनेट एलईडी हेडलॅम्‍प्‍ससह एकीकृत डीआरएल आणि आकर्षक ३डी फ्रण्‍ट ग्रिल कारच्‍या रस्‍त्‍यावरील उपस्थितीमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करते. आतील बाजूस, एक्झिक्‍युटिव्‍ह लाऊंज-स्‍टाइल रिअल सीट्ससह सुधारित थाय सपोर्ट, सॉफ्ट-टच ग्रँड प्रीस्टिजिया डॅशबोर्ड, अॅम्बियण्‍ट लायटिंग आणि एैसपैस जागा एकत्रित केबिनमध्‍ये उत्‍साहवर्धक अनुभव देतात.

टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, “गेल्‍या ५ वर्षांमधील आमचा प्रवास झपाट्याने होत असलेला विकास व परिवर्तनामधून दिसून येतो. आम्‍ही पुढे जात असताना आर्थिक वर्ष २६ वाढीव फायद्याचे असण्‍याचे असण्‍यासोबत मोठी झेप घेणारे आहे. गेल्‍या ३ वर्षांमध्‍ये १ दशलक्षहून अधिक प्रीमियम हॅचेसची विक्री होण्‍यासह आम्‍हाला विश्‍वास आहे की, हॅचबॅक्‍स भारतातील गतीशीलता क्षेत्राच्‍या महत्त्वपूर्ण भाग राहतील.

आज, आम्‍हाला अल्‍ट्रोजच्‍या नवीन व्‍हर्जनसह प्रीमियम हॅचबॅक्समध्‍ये आकर्षक नवीन चॅप्‍टर सादर करण्‍याचा अभिमान वाटतो. २०२५ एडिशन अल्‍ट्रोजला अधिक लक्षवेधक बनवते, जेथे या वेईकलमध्‍ये समकालीन डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता-केंद्रित दृष्टिकोनाचे विनासायास संयोजन आहे. यामधून आजचे प्रीमियम हॅच ग्राहक शोधत असलेल्‍या सुविधा दिसून येतात, त्‍या म्‍हणजे आधुनिक स्‍टायलिंग, प्रीमियम अनुभव, तंत्रज्ञान संपन्‍न वैशिष्‍ट्ये, उच्‍च स्‍तरीय सुरक्षितता आणि पॉवरट्रेन पर्यायांची व्‍यापक श्रेणी. ड्रायव्हिंग अनुभव उत्‍साहित करण्‍यासाठी प्रत्‍येक घटक काळजीपूर्वक डिझाइन करण्‍यात आला आहे. ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज तिच्‍या मालकांना ‘फिल स्‍पेशल’ अनुभव देईल.”

पेट्रोल, सेगमेंटमधील एकमेव डिझेल आणि टाटा मोटर्सचे आघाडीचे आयसीएनजी ट्विन सिलिंडर तंत्रज्ञानामध्‍ये ऑफर करण्‍यात आलेली ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज विविध ट्रान्‍समिशन पर्यायांमध्‍ये देखील उपलब्‍ध असेल: ५-स्‍पीड मॅन्‍युअल, सुधारित ६-स्‍पीड डीसीए आणि नवीन ५-स्‍पीड एएमटी, ज्‍यामुळे अधिकाधिक ग्राहकांना ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशनची सोयीसुविधा मिळेल.

ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज – सुरूवातीच्‍या किमती* (एक्‍स-शोरूम दिल्‍ली – लाख रूपयांमध्‍ये)

ट्रान्‍समिशनस्‍मार्टप्‍युअरक्रिएटिव्‍हअकॉम्‍प्‍लीश एस
१.२ लिटर रेवोट्रॉन६.८९७.६९८.६९९.९९
१.२ लिटर आयसीएनजी७.८९८.७९९.७९११.०९
१.५ लिटर टर्बोचार्ज्‍ड रेवोटॉर्क ८.९९ –११.२९

ऑल न्‍यू अल्‍ट्रोज बाबत:
ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज स्‍लीक, शिल्‍पाकृती लाइन्‍स आणि आकर्षक ३डी फ्रण्‍ट ग्रिलसह आधुनिक आकर्षकतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. या वेईकलमधील फ्लोटिंग रूफ डिझाइन आणि आकर्षक डोअर हँडल्‍स तिच्‍या फ्यूचरिस्टिक अपीलमध्‍ये अधिक भर करतात, ज्‍यामुळे अल्‍ट्रोजला डायनॅमिक उपस्थिती मिळते, जी तिला सेगमेंटमध्‍ये वरचढ ठरवते. प्रिस्टिन व्‍हाइट, प्‍युअर ग्रे, रॉयल ब्‍ल्‍यू, अंबर ग्‍लो आणि ड्यून ग्‍लो या पाच आकर्षक रंगांमध्‍ये, तसेच स्‍मार्ट, प्‍युअर, क्रिएटिव्‍ह, अकॉम्‍प्‍लीश एस आणि अॅकॉम्‍प्‍लीश+ एस या विशिष्‍ट परसोनामध्‍ये उपलब्ध नवीन अल्‍ट्रोज टाटा मोटर्सच्‍या वैयक्तिककरणावरील फोकसशी बांधील आहे.

प्रत्‍येक वैशिष्‍ट्यासह विशेष अनुभव घ्‍या – सुधारित डिझाइन:
ऑल-न्‍यू टाटा अल्‍ट्रोजने आकर्षकता, आरामदायीपणा आणि नाविन्‍यतेच्‍या विनासायास संयोजनासह प्रीमियम हॅचबॅक डिझाइनला नव्‍या उंचीवर नेले आहे. या वेईकलच्‍या आकर्षक पुढील बाजूस लक्षवेधक ३डी ग्रिल, ल्‍यूमिनेट एलईडी हेडलॅम्‍प्‍स आणि सिग्‍नेचर इन्फिनिटी एलईडी कनेक्‍टेड टेल लॅम्‍प्‍स आहेत, ज्‍यामुळे वेईकल रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. कूप-सारख्‍या सिल्‍हूटमध्‍ये फ्लोटिंग रूफ, शिल्‍पाकृती बॉडी लाइन्‍स आकर्षक डोअर हँडल्‍स आणि ड्रॅग-कट अलॉई व्‍हील्‍ससह अधिक आकर्षकतेची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे स्‍टाइल व ऐरोडायनॅमिक्‍समध्‍ये वाढ झाली आहे. आतील बाजूस, केबिनच्‍या सुधारणेमधून नवीन बेंचमार्क दिसून येतो. ग्रँड प्रीस्टिजिया डॅशबोर्डसह सॉफ्ट-टच पृष्‍ठभाग, गॅलॅक्‍सी अॅम्बियण्‍ट लायटिंग आणि प्रीमियम ड्युअल-टोन बीज इंटीरिअर्स अत्‍याधुनिक टोन स्‍थापित करतात. एक्झिक्‍युटिव्‍ह लाऊंड-प्रेरित रिअर सीटिंगसह विस्‍तारित थाय सपोर्ट, फ्लॅट फ्लोअर आणि व्‍यापक ९०-अंश डोअर ओपनिंग्‍ज प्रभावी आरामदायीपणाची खात्री देतात, ज्‍यामुळे प्रत्‍येक प्रवास अत्‍यंत विशेष वाटतो.

तंत्रज्ञानामध्‍ये फिल स्‍पेशलचा अनुभव घ्‍या – प्रीमियम केबिन अनुभव:
नवीन अल्‍ट्रोजची खासियत म्‍हणजे विभागातील सर्वोत्तम डिजिटल अनुभव. हार्मनच्‍या १०.२५ इंच अल्‍ट्रा व्‍ह्यू इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसोबत फुल-डिजिटल एचडी १०.२५ इंच क्‍लस्‍टरसह रिअल-टाइम नेव्हिगेशन व्‍ह्यू आहे. इतर वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

  • ३६०० सराऊंड व्‍ह्यू कॅमेरासह ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर
  • वॉईस-एनेबल इलेक्ट्रिक सनरूफ
  • वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले
  • वायरलेस चार्जिंग आणि ड्युअल ६५ वॅट टाइप सी फास्‍ट चार्जर्स
  • एअर प्‍युरिफायर आणि भारतातील उन्‍हाळ्यासाठी एक्‍स्‍प्रेस कूलिंग
  • आयआरए कनेक्‍टेड वेईकल टेक्‍नॉलॉजीसह ५० हून अधिक वैशिष्‍ट्ये गतीमध्‍ये फिल स्‍पेशलचा अनुभव घ्‍या – प्रत्‍येक जीवनशैलीसाठी पॉवरट्रेन पर्याय:
    ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज पेट्रोल, डिझेल, सीएनजी या पॉवरट्रेन्‍सच्‍या सर्वसमावेशक श्रेणीमध्‍ये, तसेच डीसीए व एएमटी ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन्‍समध्‍ये ऑफर करण्‍यात आलेली भारतातील एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे. यामधून शहरातील प्रभावी प्रवासासाठी उत्‍साहवर्धक ड्राइव्‍ह अनुभवाची खात्री मिळते.
  • १.२ लिटर रेवोट्रॉन पेट्रोल (मॅन्‍युअल, डीसीए व नवीन एएमटी) – सुधारित ड्रायव्हिंगक्षमतेसह वैविध्‍यपूर्ण ट्रान्‍समिशन पर्याय
    o १.२ लिटर आयसीएनजीसह ट्विन-सिलिंडर टेक – भारतातील सर्वात प्रगत सीएनजी सिस्‍टमसह एैसपैस बूट स्‍पेस आणि प्रीमियम वैशिष्‍ट्ये
  • १.५ लिटर रेवोटॉर्क डिझेल – भारतातील एकमेव डिझेल हॅचबॅक, जी उच्‍च टॉर्क आणि महामार्गावर प्रभावी क्रूझिंग देते.

सोयीसुविधा, कार्यक्षमता किंवा रोमांचपूर्ण ड्रायव्हिंगचा आनंद घ्‍यायचा असो अल्‍ट्रोज सर्वकाही देते, ज्‍यामुळे अस्‍सल सेगमेंट लीडर आहे.
प्रत्‍येक वळणावर सुरक्षिततेसह फिल स्‍पेशलचा अनुभव घ्‍या:

विश्‍वसनीय अल्‍फा आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आलेल्‍या अल्‍ट्रोजने भारतातील सर्वात सुरक्षित प्रीमियम हॅचबॅक असण्‍याचा वारसा कायम ठेवला आहे. सुरक्षितता वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

  • ६ एअरबॅग्‍ज आणि प्रमाणित म्‍हणून ईएसपी
  • डायमंड स्‍ट्रेन्‍थ सेफ्टी शील्‍ड – सुधारित रचनात्‍मक प्रबळतेसह सुधारित क्रम्‍पल झोन्‍स
  • एसओएस कॉलिंग फंक्‍शन (ई-कॉल/बी-कॉल)
  • ISOFIX माऊंट्स, हिल होल्‍ड असिस्‍ट, एलईडी फॉग लॅम्‍प्‍ससह कॉर्नरिंग आणि इतर अनेक

ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज आकर्षक डिझाइन परिवर्तन, आकर्षक इंटीरिअर्स आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह वारसाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते, तसेच अत्‍याधुनिकता, वैविध्‍यता, एैसपैस जागा आणि प्रीमियम वैशिष्‍ट्ये देते. तरूण, आधुनिक व महत्त्वाकांक्षी ड्रायव्‍हर्ससाठी विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आलेली ऑल न्‍यू अल्‍ट्रोज प्रत्‍येक वळणावर प्रभावित करते. याव्‍यतिरिक्‍त, मल्‍टी-फ्यूएल पॉवरट्रेन पर्याय कार्यक्षमता व रोमांचचे परिपूर्ण संतुलन देते, ज्‍यामुळे ही वेईकल खरीखुरी सेगमेंट लीडर आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रुपयांत लॉन्च…ही आहे वैशिष्‍ट्ये

Next Post

ही कंपनी इलेक्ट्रिक मोटारसायकल सेगमेंटमध्ये प्रवेशासाठी सज्ज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

post
संमिश्र वार्ता

अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित…हे आहे कारण

ऑगस्ट 23, 2025
Untitled 38
महत्त्वाच्या बातम्या

ईडीची मोठी कारवाई…आमदाराला अटक, १२ कोटीची रोख रक्कम व ६ कोटीचे दागिने जप्त

ऑगस्ट 23, 2025
WhatsApp Image 2025 08 22 at 18.17.36
संमिश्र वार्ता

विठू माझा लेकुरवाळा’ने श्रोते मंत्रमुग्ध…२५० बालकलावंतांचा भक्तीचा जागर, रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

ऑगस्ट 23, 2025
प्रातिनिधिक फोटो
इतर

अल्पवयीन मुलीस परिचीताने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

ऑगस्ट 23, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पाच लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

ऑगस्ट 23, 2025
Corruption Bribe Lach ACB
स्थानिक बातम्या

दोन हजाराच्या लाच प्रकरणात सहाय्यक फौजदारासह एक खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

ऑगस्ट 23, 2025
anil ambani
इतर

अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे…बँक कर्ज फसवणूक प्रकरणाचा आरोप

ऑगस्ट 23, 2025
cbi
संमिश्र वार्ता

बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने केली एकाला अटक…

ऑगस्ट 23, 2025
Next Post
Oben Electric Facility image 01

ही कंपनी इलेक्ट्रिक मोटारसायकल सेगमेंटमध्ये प्रवेशासाठी सज्ज

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011