मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – शेअर बाजारासंदर्भात असे म्हटले जाते की, जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. कारण या बाजारात ‘खरेदी, विक्री आणि विसरा’ असे धोरण आहे. या फॉर्म्युल्यातून गुंतवणूकदार दीर्घकाळात मोठा फायदा मिळवू शकतात. शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल, तर आज तुम्हाला अशा मजबूत स्टॉकबद्दल म्हणजे मल्टीबॅगर स्टॉक रिटर्न माहिती असणे आवश्यक आहे. कारण, त्यामध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवून श्रीमंत झाले आहेत. टाटा समूहाच्या रिटेल शाखा ट्रेंटबद्दल सांगायचे तर ही नोएल टाटा यांच्या अध्यक्षतेखालील कंपनी आहे. आता त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…
गेल्या 23 वर्षांतील या स्टॉकचा कल पाहिल्यास, 1 जानेवारी 1999 रोजी NSE वर त्याची किंमत 9.87 रुपये होती आणि 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत हा स्टॉक वाढून 1,067.30 रुपये प्रति शेअर झाला. या कालावधीत समभागाने सुमारे 10,713.58 टक्के वाढ नोंदवली आहे. दहा वर्षांपूर्वी, 14 फेब्रुवारी 2012 रोजी, ट्रेंटचे शेअर्स NSE वर रु. 94.04 वरून आता रु. 1,067.30 वर पोहोचले आहेत. वर्षभरात 1.20 टक्क्यांची वाढ : या काळात या समभागाने 1034.94 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. त्याच वेळी, 5 वर्षांपूर्वी, या स्टॉकची किंमत सुमारे 246.10 रुपये (NSE 19 मे 2017 रोजी) पातळीवर होती. या कालावधीत सुमारे 333.69 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या समभागात वर्षभरात 1.20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सुमारे 23 वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 रुपये लाख गुंतवले असते, तर आज 1 लाखाची रक्कम 1.08 कोटी रूपये झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज 1 लाख रुपयांचे 11.34 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या रिटेल स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाखाचे आज 4.33 लाख रुपये झाले असते. नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा समूहाची किरकोळ शाखा असलेल्या ट्रेंटने 85 टक्के वार्षिक महसूल वाढीवर स्वतंत्र निव्वळ नफ्यात 79 टक्के वाढ नोंदवली आहे. ट्रेंटचा महसूल त्याच्या अंदाजापेक्षा पुढे होता, तर EBITDA, ICICI यांच्या सिक्युरिटीजच्या अपेक्षेनुसार होता. तसेच कंपनीच्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज कंपन्याही या समभागावर तेजीत आहेत. काही ब्रोकरेज हाऊसच्या मते, कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे, त्यामुळे त्यात गुंतवणूक केल्यास नफा मिळू शकतो.