मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करणे ही गुंतवणूकदारांसाठी जोखमीची बाब असली तर गुंतवणूकदार चांगल्या संधीच्या शोधात असतात. यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो. आता टाटा ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेअर खरेदीची अशी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांना चांगला फायदा होऊ शकतो, असे म्हटले जाते.
शेअर्स बाजार गुंतवणूकदार तज्ज्ञांनी सांगितले की, टाटा समूहाच्या पोलाद कंपनीच्या टाटा स्टीलच्या शेअर्सबाबत संधी असून त्यांनी ते खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा स्टीलवर अनेकांनी आपली तेजीची भूमिका कायम ठेवली आहे. सध्या हा शेअर बीएसईवर 1100 ते 1200 रुपयांच्या आसपास आहे.
तज्ज्ञांच्या मते हा शेअर तब्बल 1700 पर्यंत जाईल. तसेच त्याला ‘बाय’ रेटिंगही दिले आहे. म्हणजेच, जर तुम्ही सध्याच्या शेअरच्या किमतीची तुलना अशा प्रकारे केली तर हा शेअर सुमारे 52.52 टक्के परतावा देऊ शकतो. तज्ज्ञांनी सांगितले की, चांगले कार्यरत भांडवल व्यवस्थापनामुळे कंपनीचे कर्ज कमी होत असून ते 51,049 कोटी रुपयांवर आले आहे.
एका अहवालात म्हटले आहे की, “टाटा भारतातील नैसर्गिक विस्ताराद्वारे 19.6mtpa वरून 40mtpa पर्यंत क्षमता दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. यासाठी अनेक पर्याय हायलाइट करण्यात आले आहेत जे अंतर्गत रोख क्षमता वाढविण्यात मदत करतील. या शेअरमध्ये तुमचे पैसे दुपटीहून अधिक असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
टाटा स्टीलने मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 37 टक्क्यांनी 9,835.12 कोटी रुपयांची वाढ नोंदवली. गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीने 7,161.91 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता, असे बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे. याव्यतिरिक्त, कंपनीच्या बोर्डाने 10:1 स्टॉक स्प्लिटची शिफारस करून प्रति शेअर 51 रुपयां लाभांश घोषित केला आहे.
(महत्त्वाची सूचनाः शेअर बाजारात गुंतवणूक करणे अतिशय जोखमीचे आहे. त्यामुळे त्यात गुंतवणूक कण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा)