मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात दुचाकी आणि चारचाकी वाहननिर्मितीच्या क्षेत्रात आपला अमूल्य ठसा उमटवणाऱ्या टाटा मोटर्सने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. टाटा मोटर्सने आज आपली नवी ईव्ही कॉन्सेप्ट (Tata Curvv EV Car) कार सादर केली आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिनुसार, टाटाच्या नव्या इलेक्ट्रिक कारचे नाव Tata Curvv EV Car असे आहे. एसयूव्ही डिझाइनच्या नव्या युगाची व्याख्या करताना टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्ट असलेल्या Curvv चे अनावरण केले आहे. टाटाची ही इलेक्ट्रिक कार अनेक अत्याधुनिक फिचर्सने सज्ज आहे. यामध्ये अत्याधुनिक सनरूफ सारखे मॉडर्न फिचरही पाहायला मिळणार आहे.
या कॉन्सेप्ट ईव्हीमध्ये मागील विंडस्क्रीन, इलेक्ट्रिक एसयूव्हीवर कूपसारखी रूफलाईन दिसून येते. तर रियर स्पॉयलर कर्व्हसारखा दिसतो. इलेक्ट्रिक कारमध्ये कूप-शैलीच्या रूफलाइनच्या खाली काही चांगले रूप रेल्ससुद्धा आहे. जागतिक स्तरावर विक्री होणाऱ्या एसयूव्हीप्रमाणेच ही कॉन्सेप्ट ईव्ही दिसते. टाटाच्या आगामी कॉन्सेप्ट ईव्हीबद्दल लवकरच माहिती समोर येणार आहे.
या दिमाखदार ईव्हीचे इंटिरियर खूपच जबरदस्त आहेत हे पाहता क्षणी कळतात. यामध्ये चांगले सनरूफ, चांगली जागा पाहायला मिळते. कारची कर्व्ह डिझाइन ग्राहकांना खूपच आकर्षित करणार आहे. यामध्ये मोठा बूट स्पेस पाहायला मिळणार आहे, हे कॉन्सेप्ट इमेजवरूनच लक्षात येते.
आगामी टाटा इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्टमध्ये शार्प लाइन्स आणि डिझाइन एलिमेंटसारखे फ्रंट फॉग लाइट स्ट्रक्चर, सी पिलरच्या मागील भाग, तसेच पूर्ण कारमध्ये चांगले हेटलाइट्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ही कार चांगलीच आक्रामक दिसणार आहे. हे सर्व फिचर्स टिझर व्हिडिओत दिसून आले आहेत. टाटाच्या विद्यमान श्रेणी आणि डिझाइन भाषेतून ही संकल्पना निश्चितच एक मोठे पाऊल आहे.
कॉन्सेप्ट CURVV SUV जनरेशन २ आर्किटेक्चरकडे वाटचाल करत आहे. फर्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये २५० किलोमीटरहून अधिकच्या प्रमाणित श्रेणी देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. आता दुसऱ्या पिढीच्या उत्पादनामध्ये जलद चार्जिंग पर्यायासह ४००-५०० किलोमीटर धावण्याची क्षमता असणार आहे. उत्पादनामध्ये तांत्रिक वैशिष्ट्येसुद्धा असतील.