पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व सेवा आणि उद्योग व्यवसाय ठप्प होते, परंतु आता तिसरी लाट देखील संपली असून देशभरातील सर्वच राज्यात व्यवहार आणि उद्योग-व्यवसाय पूर्व झाले आहेत, तरीही नागरिक स्वतःची काळजी घेत आहेत त्यामुळे सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना काळजी घेतली जाते. सहाजिकच आपल्याकडे स्वतःचे वाहन असावे आपल्या कुटुंबाला चारचाकी वाहनातून प्रवास करता यावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. परंतु वाहनांच्या वाढत्या किंमती पाहता ती पूर्ण होत नाही, मात्र आता टाटाच्या अनेक वाहनांवर सुमारे 85 हजार रुपयांपर्यंत सूट असल्याने याचा फायदा ग्राहकांना घेता येऊ शकतो आणि स्वतःचे वाहन खरेदी करता येऊ शकते. टाटा मोटर्स या मार्च महिन्यात आपल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. सवलत अंतर्गत, टाटा वाहने 85,000 रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी केली जाऊ शकतात. सवलती अंतर्गत रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर उपलब्ध आहेत. सर्वात मोठी सूट Tata Harrier वर उपलब्ध आहे. Tata च्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे ते जाणून घेऊ या…
टाटा हॅरियर (रु. 85,000 पर्यंत सूट)
टाटाकडून या मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर 85,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 60,000 रुपयांचा वैयक्तिक लाभ आणि 25,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ समाविष्ट आहे. टाटा हॅरियरला 2.0-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
टाटा सफारी (रु. 60,000 पर्यंत सूट)
टाटाकडून या मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर 60,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या 7 सीटर एसयूव्हीची किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ते वाहन 23.29 लाख रुपयांपर्यंत जाते. याला हॅरियरसारखे 2.0-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
टाटा टिगोर (रु. 35,000 पर्यंत सूट)
टाटा टिगोर ही कंपनीची कॉम्पॅक्ट सेडान कार आहे, जिची किंमत 5.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 8.41 लाख रुपयांपर्यंत जाते. यामध्ये, कंपनी 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन (86PS/113Nm) देते, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT शी जुळते. सध्या ती मारुती सुझुकी डिझायर, ह्युंदाई ऑरा आणि होंडा अमेझ सारख्या वाहनांशी स्पर्धा करते.
Tata Tiago (रु. 30,000 पर्यंत सूट)
टाटा टियागो ही कंपनीच्या टाटा टिगोरची हॅचबॅक आवृत्ती आहे. यामध्ये इंजिन आणि फीचर्सही सारखेच आहेत. यात सध्या 30 हजारांपर्यंत सूट मिळवून टिगोर घेऊ शकता. यात 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन (86PS/113Nm) मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT शी जुळते. त्याची स्पर्धा मारुती सुझुकी वॅगनआर, ह्युंदाई सँट्रो यांसारख्या वाहनांशी आहे.
Tata Nexon (रु. 25,000 पर्यंत सूट)
Tata Nexon ही फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV कार ठरली आहे. मार्चमध्ये यावर 25,000 रुपयांपर्यंत सूट आहे. हे 110hp, 1.5-लीटर टर्बो-डिझेल आणि 120hp, 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे, मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसाठी जोडलेले आहे. ते Hyundai Venue, Kia Sonet आणि Maruti Vitara Brezza सारख्या वाहनांशी स्पर्धा करते. नेक्सॉनला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे.