मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी या टाटा मोटर्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीच्या उपकंपन्यांनी आज भारतातील सर्वांत मोठ्या सहकारी बँकांपैकी एक असलेल्या सारस्वत बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे. या भागीदारीमार्फत टाटा मोटर्सकडून इंटर्नल कंबश्चन इंजिन आणि इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना ऑटो रिटेल वित्तपुरवठा उपाययोजना दिल्या जातील.
हा सहयोग ग्राहकांना स्पर्धात्मक व्याज दर व परवडण्याची क्षमता आणि सुलभता देऊन त्यांचा खरेदीचा अनुभव चांगला करण्यासाठी तसेच टाटा मोटर्सच्या उत्पादन पोर्टफोलिओतील ग्राहकांना लोकप्रिय प्रवासी वाहने (आयसीई + ईव्ही) सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल. या सामंजस्य करारावर टाटा मोटर्स आणि सारस्वत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे मुख्य वित्तीय अधिकारी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि.चे उपाध्यक्ष श्री. धीमन गुप्ता म्हणाले की, “ग्राहक केंद्रीभूततेला मध्यवर्ती ठेवणारा एक ब्रँड म्हणून आम्ही ग्राहकांना सुलभता आणि कमी दर देण्याच्या शक्यता शोधत असतो. सारस्वत बँकेसोबतची ही भागीदारी योग्य दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ते स्पर्धात्मक दरात कस्टमाइज्ड वित्तीय उपाययोजना देण्यासाठी उपयुक्त आहे. ही भागीदारी टाटा मोटर्सच्या आयसीई व ईव्हीज उपलब्ध करून देणे आणि त्याचवेळी आमच्या ग्राहकांना एक सुलभ व आनंददायी अनुभव देण्यासाठी महत्त्वाची आहे.”
सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की, “आम्हाला टाटा मोटर्ससोबत भागीदारी करून आमच्या ग्राहकांना विविध प्रकारच्या कस्टमाइज्ड आणि स्पर्धात्मक वित्तपुरवठा योजना देताना खूप आनंद होत आहे. त्यांचे उद्दिष्ट वाहनखरेदी सुलभ आणि लवचिक करण्याचे आहे. या भागीदारीद्वारे आम्हाला आशा वाटते की, देशात ईव्ही संस्कृतीला चालना देत असतानाच आम्ही आमच्या ग्राहकांना व्यापक पर्याय निवडण्याची संधी देऊ शकतो.”
नावीन्यपूर्णतेप्रति कटिबद्धता, सुरक्षा, बुद्धिमत्ता आणि शाश्वतता यांना प्राधान्य देणाऱ्या उपाययोजना यांच्याद्वारे टाटा मोटर्स भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात आघाडीवर आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्सच्या शक्तिशाली गाड्यांसह ही कंपनी प्रत्येक ग्राहकासाठी एक उत्तम गाडी आणते. दर्जा, वैविध्यपूर्णता आणि भविष्याधारित दृष्टीकोन अंगीकारून टाटा मोटर्सच्या गाड्या आधुनिक ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांशी जुळणाऱ्या आहेत.