नाशिक – नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तक्रार निवारण कक्ष बरोबर स्थानिक पातळीवर गतिमानता यावी यासाठी विशेष टास्क फोर्स तैनात केले असून संपूर्ण जिल्ह्याचा कानोसा घेत प्रत्येक ठिकाणची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी थेट संपर्क योजना आखली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी १०० ऐवजी डायल ११२ ही नवीन मदत वाहिनी कार्यान्वित करण्यात आली.त्याचे प्रत्याक्षिक प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोरजे व पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या समोर सादर करण्यात आले.सदर अभियान नव्याने सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना अथवा तक्रारदाराला मिळणाऱ्या सेवेत गतिमानता येण्यासाठी आता सहा जणांचे पथक गावागावात जाऊन तत्पर सेवेला प्रारंभ करतील.त्यामुळे जिल्यातील कायदा सुव्यस्था बरोबरच अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे.एकूणच पोलीस दलातील सुरू असलेली गतिमानता लक्षात घेता हे पथक आणखी तत्परतेने नागरिकांच्या तक्रार निवारणात मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांमध्ये समाधान
स्थानिक पोलीस ठाणे,गुन्हे,वाहतूक,आर्थिक गुन्हे शाखा ई.या प्रणालीत कार्यरत आहे.परंतु इगतपुरी पासून ते मालेगाव पर्यन्त असलेला विस्तार बघता हे पथक सर्वच बाबतीत कार्यतत्पर राहून विशेष भूमिका बजावेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांच्या शिथिलते बरोबर काही हॉटस्पॉट गावांना भेटी देत विशेष कारवाई बरोबरच स्थानिक नागरिकांच्या तक्रार तपासा संदर्भात काम करेल विशेष म्हणजे प्रत्येक बाबींचा अहवाल थेट जिल्हा पोलिसप्रमुखांना सादर करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे.