इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पालघरः पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला आज भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत अद्याप अधिकची माहिती मिळू शकली नाही.
मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्यात पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यानंतर कारखान्यातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडत आहेत. याचा व्हिडीओही समोर आला आहे. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराचे लोट आकाशात वरपर्यंत जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे; मात्र आग कशी लागली? त्याची कारणे अद्याप कळू शकलेली नाहीत.
याआधी २० सप्टेंबर २०२४ रोजी पालघरमध्ये एका रासायनिक कारखान्याला आग लागली होती. या आगीत सहा कर्मचारी जखमी झाले होते. राज मौर्य, निशिकांत चौधरी, पवन देसले, संतोष हिंदलेकर, आदेश चौधरी आणि चंदन शहा अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा येथे आगीची घटना समोर आली आहे.