नवी दिल्ली – तारक मेहता का उल्टा चष्मा या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध विनोदी मालिकेबद्दल रोज काहीना काही चर्चा सुरू असते. या मालिकेतील सर्व व्यक्तीरेखा निभावलेल्या कलावंतांचे वैयक्तिक चाहते आहेत, ही सर्वात विशेष बाब आहे. ही मालिका ज्यांच्या जोरावर इतकी प्रसिद्ध झाली, असे मुख्य कलाकार आज या मालिकेत काम करत नाहीयेत.
१) दया भाभी
या यादीत दयाबेन या व्यक्तिरेखेचा पहिला क्रमांक येतो. दिशा वकानी यांनी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. गरोदर असल्याने त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर शुल्क वाढविण्यावरून निर्माता आणि कलाकारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मागणीनंतरही दयाबेन मालिकेत दिसू शकत नाहीय.

२) टप्पू
दिशा वकानी यांच्याशिवाय मालिकेत त्यांच्या मुलाची भूमिका साकारणारा भव्या गांधी याने प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर ही मालिका सोडली होती. मालिकेत या व्यक्तिरेखेला जास्त वाढ नसल्याने त्याने मालिका सोडल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये आले होते.
३) सोनू
या मालिकेत भिडे भाई यांची मुलगी सोनू ही व्यवक्तिरेखा साकारणार्या दोन अभिनेत्री मालिका सोडून गेल्या आहेत. पहिल्यांदा झील मेहता हिने ही व्यक्तिरेखा साकारली होती. २०१२ मध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने मालिकेतून निरोप घेतला होता. त्यानंतर अभिनेत्री निधी भानूशाली या व्यक्तिरेखेत दिसली. परंतु आता पलक सिंधवानी या भूमिकेसाठी काम करत आहे.
४) स्विटी
तारक मेहताच्या कलाकारांच्या यादीत सुरभी चंदनाचा समावेश होता. ती या मालिकेत स्विटीची भूमिका साकारत होती. परंतु संवादाच्या ओळी विसरत असल्याने निर्मात्यांनी तिला खूपच हैराण केले, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तिने मालिका अर्धवट सोडून दिली.










