मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय शोमधील मुख्य पात्र जेठालाल आणि त्याच्या कुटुंबासोबतच भिडे, डॉक्टर हाथी, टप्पू आणि पत्रकार पोपटलाल यांसारख्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडतात. या शोची मुख्य व्यक्तिरेखा दयाबेन मात्र 3 वर्षांहून अधिक काळ पडद्यावरून गायब आहे, पण चाहते दयाबेनला खूप मिस करत आहेत. आता अशा परिस्थितीत आता तिच्या चाहत्यांना तिला पुन्हा शोमध्ये पाहायचे आहे, दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे की, कदाचित दयाबेन लवकरच परत येऊ शकते. त्यामुळे दयाबेन या पात्राची सध्या चर्चा सुरू आहे. दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वाकाणीने प्रेग्नेंसीमुळे शोला अलविदा केला होता, तेव्हापासून ती सतत शोपासून दूर आहे. चाहत्यांना आणि निर्मात्यांना तिला परत शो मध्ये पाहायचे आहे, परंतु तसे होत नाही, परंतु आता पुन्हा एकदा दयाबेनच्या पुनरागमनाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
टीव्हीला छोटा पडदा असे म्हटले जाते, कारण घराघरात मनोरंजनासाठी टीव्ही चा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यातच वेगवेगळ्या चॅनल वर नानाविध मालिका सुरू असतात. परंतु काही मालिका खूप काळ चालतात. त्यापैकीच एक मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा होय. या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः एक तपापेक्षा जास्त काळ खिळवून ठेवले आहे. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चाललेली दिसते, कारण या मधील गुणी कलाकार होय तारक मेहता का उल्टा चष्मा ही लोकप्रिय टीव्ही मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोचे पात्र प्रत्येकाच्या हृदयात कोरले गेले आहे आणि चाहत्यांना प्रत्येक क्षणी त्यांच्याशी जोडले जावेसे वाटते. दरम्यान, दिशा वकानीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती होळी खेळताना दिसत आहे. फोटो सोबतच्या कॅप्शनमध्ये दिशाने लिहिले आहे की, ‘होळी येत आहे…’ हा फोटो पाहून प्रेक्षक खूप गोंधळात पडले आहेत.
दिशा वकानीच्या एका चाहत्याने लिहिले आहे, ‘कृपया होळीनंतर या…’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘होळीचा दिवस सुंदर असेल…’ कृपया होळीनंतर गोकुळधाममध्ये या. त्याचवेळी तिने ‘मी होळीच्या दिवशी आले असते, तर आणखी मजा आली असती’, असे लिहिले. दिशा वकानीने तारक मेहतावर आपला ठसा उमटविला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मधून दिशा वकानीला ब्रेक घेऊन बराच काळ लोटला आहे. पण दया बेनने शोमधील तिच्या व्यक्तिरेखेची अशी छाप सोडली आहे की, तिचे चाहते अजूनही तिला मिस करतात. त्याच्यासारखा अभिनय करणारा कोणीच नाही, असे अनेक चाहते सांगतात. दरम्यान, दिशा पुनरागमन करणार असल्याच्या बातम्या अनेकदा येत होत्या पण तसे मात्र अद्याप झालेले नाही.