सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टिव्हीवरील अत्यंत लोकप्रिय मालिकेतील पात्र असलेल्या ‘बबिता’ अर्थात मुनमुन दत्ताने नवा व्यवसाय सुरू केला आहे. बबिता ची भूमिका करणाऱ्या मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या व्यवसायाबद्दल सांगितले आहे. मुनमुन आता केवळ अभिनेत्री आणि ब्लॉगरच नाही तर एक बिझनेस वुमन बनण्याच्या मार्गावरही निघाली आहे. आपल्या सर्वांची आवडती बबिता जी आता फूड बिझनेसमध्ये पाऊल ठेवणार आहे. मुनमुन दत्ता खाण्यापिण्याची शौकीन आहे , आता तिने या छंदाला आपला व्यवसाय बनवण्याची तयारी सुरू केली आहे. मुनमुन ने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की तिच्यासोबत या व्यवसायात भागीदार देखील आहे. मुनमुन दत्ताने सांगितले की, ती तिचा राखी भाऊ आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटचे मालक केयूर सेठसोबत काम सुरू करणार आहे. आपल्या फूड बिझनेसबद्दल बोलताना मुनमुन दत्ताने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, हे क्लाउड किचन असेल. जे फूड अॅप्सवर उपलब्ध असेल.
मुनमुन दत्ताने तिच्या फूड जॉइंट्सची यादी केली आहे जी म्हणजे: Feb87, The Monk Spoon, Bollywood juice factory आणि Cha Thepla. अशी आहे. मुनमुन दत्ताच्या अभिनयाला २००४ च्या ‘ हम सब बाराती’ या टिव्ही शो मधून झाली आहे. तिने 2005 मध्ये कमल हासनच्या ‘मुंबई एक्सप्रेस’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, त्यानंतर 2006 मध्ये ‘हॉलिडे’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली. नवीन बिझिनेस सुरु केल्यानंतर मुनमुन किती वेळ अभिनयामध्ये सक्रीय असेल हा प्रश्न आहे.
https://youtu.be/FsXmIB1SioI