सेलिब्रिटी अभिनेत्री असो की, अभिनेता यांचा व्हिडीओ चाहत्यांना नेहमीच आवडतो. मग ते सेलिब्रिटी चित्रपट, नाटकातील असो की एखाद्या टीव्ही मालिकांमधील असो. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा ‘ मधील दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणी हिचा एक अनोखा अंदाज मधील व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे, वास्तविक हा व्हिडिओ नवीन नसून जुनाच आहे. परंतु चाहत्यांनी त्याला खूपच पसंती दिलेली दिसून येत आहे.
अभिनेत्री दिशा वाकाणी हिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात. दरम्यान, दिशाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, दिशाचा एक जुना म्युझिक व्हिडिओ असून तरीही तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ‘दर्या किनारे एक बंगला …’ या गाण्यात दिशाने एका चोराची भूमिका साकारली आहे, तो चोर पोलिस कर्मचाऱ्याचे पाकीट चोरतो आणि मच्छीमारांच्या वस्तीमध्ये शिरतो. यानंतर गायन व नृत्य सुरू होते.
दिशाचा हा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर मोबाईल वापरकर्त्यांना खूप आवडला असून तिचे नृत्य आणि ड्रेसिंगही चाहत्यांना आवडले आहे. विशेष म्हणजे दिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
दरम्यान, काही वर्षापूर्वी दिशा वाकाणीचा आणखी दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिशा हॉलिवूड चित्रपटाचे काल्पनिक पात्र हार्ले क्विन लूकमध्ये दिसली होती.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!