मुंबई – तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रसिद्ध आहे. यात रिता रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा सोशल मीडियावर नुकतीच ट्रोल झाली. प्रियाने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये तिच्या ब्रा ची स्ट्रिप दिसत होती. युजर्सना ही बाब खटकली आणि अनेकांनी घाणेरडे कमेंट केले.
स्टायलिश फोटो
या फोटोत प्रियाने निळा डेनिम शर्ट आणि ब्लॅक पँट परिधान केली आहे. मोकळे सोडलेले केस आणि तिने लाल लिप्स्टिक लावली आहे. या फोटोंमध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे.प्रियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, आपल्या आत्मासाठी जे काही चांगले आहे, ते करून टाका. प्रियाच्या फोटोंना तिचे पती आणि मालिकेचे दिग्दर्शक मानव राजदा यांनी क्लिक केले होते.
पतीने सुनावले खडे बोल
युजर्सनी फोटोवर कमेंट केल्यानंतर तिचे पती मानव राजदा यांनी युजर्सची शाळाच घेतली. ते म्हणाले, आपल्या आई-बहिणींनाही बोलून बघ, बघ काय प्रतिक्रिया येतात ते. काही युजर्सनी प्रियाचे समर्थनही केले.