मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वरिष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असलेले ताराचंद म्हस्के पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मंगळवारी सोडचिठ्ठी देऊन पुन्हा अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा परतले आहेत. मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी म्हस्के पाटील यांना पुष्पगुछ देऊन पक्षात दाखल करून घेतले.
तारचंद म्हस्के पाटील यांचे अजितदादा यांचेशी दीर्घाकाळापासून सलोख्याचे संबंध आहेत. अजितदादा यांच्या आग्रहास्तव म्हस्के पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला होता. प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांचेवर पक्षाने जबाबदारी सोपवली होती. लोकसभा निवडणुकी नंतर म्हस्के पाटील यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. मात्र तिकडे फारसे रमले नाहीत. म्हस्के पाटील आठ महिन्यातच पुन्हा अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. आणि मंगवारी म्हस्के पाटील स्वगृही परतले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगवारी मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सभागृहात पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी वरिष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, प्रवक्ते ताराचंद म्हस्के पाटील यांना अजितदादा यांनीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल करून घेतले. पक्षातर्फे त्यांचे अजितदादा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आ. सतिश चव्हाण, आ, विक्रम काळे, आ. अमोल मिटकरी, आ. शिवाजीराव गर्जे,मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, पक्षाचे सरचिटणीस लतीफ तांबोळी, संजय बोरजे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.