नाशिक – मुंबई पोलीस पथकासाठी निर्भया गीत लिहिणा-या कवयित्री तन्वी अमित यांची विशेष मुलाखत उत्तरा तिडके हिने इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये घेतली. यावेळी तन्वी अमित म्हणाल्या की, मुंबई पोलीस पथकासाठी निर्भया गीत लिहितांना खूप आनंद झला. तू रणरागिनी, तू स्वामिनी या ओळी लिहितांना खूप छान वाटत होतं. पण, आजही अशा प्रकाराच्या पथकाची गरज महिलांना भासते, आजही महिला सुरक्षित नाही. या विचाराने खूप वाईटही वाटते. यावेळी त्यांनी या गीताचे अनुभवही शेअर केले.
या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडत माहितीही दिली. आज मी एक लेखीका कवयित्री आहे. पण सुरुवातीला माझ्यातील हे गुण मला माहीत नव्हते. भारताबाहेर असताना खूप फावला वेळ होता. या वेळेत काय करायचं म्हणून लिखाण सुरू केल. ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की लिखाण हे माझं पॅशन आहे. मग लिहीत गेले आणि जगातील प्रांतिक भाषेतील माझा ब्लॅाग सर्वश्रेष्ठ ठरला. यावेळी त्यांनी आवडत्या लेखिका, आईच्या कविता यासह महिलांच्या विषयांवरही आपले मत मांडले. ही संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी या लिंकवर क्लीक करा….