इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तामिळनाडूचे अभिनेता आणि राजकारणात सक्रिय झालेल्या विजय थलपती यांच्या करुर येथील रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला. तर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
विजय थलपती यांनी मोठी सभा करुर येथे आयोजित केली होती. या सभेला लाखो लोक जमा झाले. ही गर्दी अनियंत्रित झाली. त्यानंतर अचानकपणे चेंगराचेंगरी सुरु झाली. थलपती सभेला संबोधीत करत असतांना ही घटना शनिवारी सांयकाळी घडली. यात थलपतीचे काही कार्यकर्ते सुध्दा बुशेध्द झाले. ही घटना थलपती यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने भाषण थांबवले आणि कारवर चढून लोकांना पाणी बॅाटल वाटण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेच रुग्णवाहिका आल्या आणि जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, काल टीव्हीके (तमिलगा वेत्री कळघम) प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्या सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. आपल्या राज्याच्या इतिहासात कधीही राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला नाही आणि भविष्यातही अशी दुर्घटना घडू नये. सध्या ५१ जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. जड अंतःकरणाने मी प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. जखमींना १ लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. मी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी आयोगाद्वारे सत्य बाहेर येईल. मी राजकीय हेतूने काहीही बोलू इच्छित नाही. चौकशी आयोगाद्वारे सत्य उघड झाल्यानंतर, निश्चितच कठोर कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन पुढे म्हणाले, “मी येथे खूप दुःखाने उभा आहे. करूरमध्ये झालेल्या भयानक अपघाताचे मी वर्णन करू शकत नाही. काल, संध्याकाळी ७:४५ च्या सुमारास, मी चेन्नईमध्ये अधिकाऱ्यांशी बोलत असताना, मला करूरमध्ये अशी घटना घडल्याची बातमी मिळाली. मला माहिती मिळताच, मी माजी मंत्री सेंथिल बालाजी यांना फोन केला, त्यांना चौकशी करण्यास सांगितले आणि रुग्णालयात जाण्याचे निर्देश दिले. मृतांच्या संख्येची बातमी ऐकताच, मी जवळच्या मंत्र्यांना करूरला जाण्याचे निर्देश दिले.
पीडितेचा नातेवाईक झाकीर म्हणतो, “विजय सकाळी ९ वाजता येणार होता, पण तो त्या वेळी आला नाही. त्यामुळे, मोठी गर्दी होती… विशेषतः थिरुकोइलुरेजवळ, अनेक तरुण आणि महिलांची मोठी गर्दी होती… अशा बैठकांमध्ये, महिला आणि मुलांना सोबत आणू नये. कृपया, ते पाहणे खूप कठीण आणि भावनिकदृष्ट्या वेदनादायक आहे.