विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/चेन्नई
अन्नाद्रमुक पक्षाच्या संस्थापक जयललिता यांच्या पश्चात झालेल्या तामिळनाडू विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अन्नाद्रमुकला पराभवाची धूळ चाखायला मिळाली आहे. तर, विरोधक असलेल्या द्रमुकने शानदार कामगिरी करीत विजय मिळविला आहे. एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वात झालेल्या या निवडणुकीत द्रमुकने बहुमत मिळविले आहे. भाजपशी आघाडी करणारा अन्नाद्रमुक आता विरोधी बाकांवर बसणार आहे,
तामिळनाडूमध्ये एकूण २३४ विधानसभा जागांसाठी निवडणूक झाली असून, बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहेत. सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यावर तामिळनाडूत द्रमुकच्या अनेक दिग्गज उमेदवारांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आता सध्या द्रमुकने १४६ जागांवर विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने ८७ जागांवर यश मिळविले आहे.
प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून विजय मिळवला आहे. कमल हसन विरूध्द मयूरा जयकुमार यांच्यात अटीतटीची लढत रंगली होती. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूक अभिनेता कमल हसन याने यंदा निवडणुकीत उडी घेतल्याने चुरस निर्माण झाली होती. त्यांच्या मक्कल नीधी मय्यम पक्षाला ( मनीम तथा एमएनएम ) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
यंदाच्या निवडणुकीत एडीएमने भाजपासोबत आघाडी केली असून डीएमके स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. काँग्रेसला सुरवातीला केवळ २ जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपाला सुरवातीपासून एकाही जागेवर आघाडी घेता नाही. तर, मक्कल निधी मय्यम पक्षाला केवळ पक्षप्रमुख असलेल्या कमल हसनच्या कोईम्बतूर येथील जागेवरच विजय मिळवता आला आहे.
विशेष म्हणजे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकला धुळ चारत द्रमुकने जोरदार मुसंडी मारली आहे. सकाळी सुरुवातीचे निकाल आल्यापासून द्रमुक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, कोरोना काळातही या पक्षाच्या कार्यालयाबाहेर गर्दी होताना दिसत आहे.
तामिळनाडूमध्ये विरोधी बाकांवरील द्रमुक सत्तेत येताना दिसत आहे. सध्या सत्ताधारी अण्णाद्रमुक आता विरोधी बाकावर जाणार आहे. तामिळनाडूमध्ये अटीतटीची लढत होत असताना द्रमुक पक्ष विजयी झाला आहे. २३४ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत द्रमुक सत्तेत येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला होता तो खरा ठरला आहे.
—