इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तामिळनाडूच्या मदुराईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागली. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान अन्य २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मदुराई रेल्वे स्थानकाजवळील बोडी लेन येथे उभ्या असलेल्या पर्यटक ट्रेनला शनिवारी पहाटे आग लागली. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. कॉफी बनवत असतानाच अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. आणि डब्याला आगीच्या ज्वाळांनी घेरले.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रेन रामेश्वरमला जात होती. तिचे नाव पुनालूर मदुराई एक्सप्रेस असे सांगितले जात आहे. आग लागलेल्या डब्यातील बहुतांश प्रवासी लखनौहून चढले होते. मृत्युमुखी पडलेले बहुतांश लोक उत्तर प्रदेशातील आहेत. पहाटे ५.१५ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. त्यावेळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवण्यात आली. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खाजगी/वैयक्तिक डब्यात आज पहाटे ५:१५ वाजता मदुराई यार्डमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. आग आटोक्यात आली असून इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही.
मदुराईचे जिल्हाधिकारी एमएस संगीता यांनी सांगितले की, आज पहाटे साडेपाच वाजता मदुराई रेल्वे स्थानकावर एका डब्याला आग लागल्याची घटना घडली. या डब्यात यात्रेकरू होते आणि ते उत्तर प्रदेशातून प्रवास करत होते. आज सकाळी त्यांनी कॉफी बनवण्यासाठी गॅसची शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला असता सिलिंडरचा स्फोट झाला. आतापर्यंत ५५ जणांना वाचवण्यात यश आले असून १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य सुरू आहे.
ट्रेनला आग लागल्याचा खुलासा दक्षिण रेल्वेने केला आहे. प्रवाशाने गुपचूप वाहून नेत असलेल्या गॅस सिलेंडरमुळे ही आग लागल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी गॅस सिलिंडरची खाजगी पार्टीच्या डब्यात “बेकायदेशीरपणे तस्करी” होते. डब्याला लागलेली आग खूप भीषण होती, ती अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या कष्टाने विझवली.
शनिवारी पहाटे ५.१५ वाजता आग लागली आणि अर्ध्या तासानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ७.१५ वाजता आग आटोक्यात आणल्याचे दक्षिण रेल्वेने सांगितले. अधिका-यांनी सांगितले की घटनास्थळी विखुरलेल्या वस्तूंमध्ये एक सिलेंडर आणि बटाट्यांची पिशवी समाविष्ट आहे, हे दर्शविते की तेथे स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पार्टीचा डबा नागरकोइल जंक्शन येथे ट्रेनला जोडण्यात आला होता आणि 17 ऑगस्ट रोजी लखनऊ येथून प्रवास सुरू झाला. ते उद्या चेन्नईला जाणार होते आणि तिथून लखनौला परतणार होते.
Tamil Nadu Madurai Train Fire Burn 20 Death