इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातील महिलांच्या अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मणिपूर, बिहार, नवी दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, केरळ यासारख्या राज्यांमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यात महिलांचा लैंगिक छ्ळ, मारहाण, विनयभंग, बलात्कार अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडलेल्या दिसून येत आहेत. यातून समाज कोणत्या स्तराला चालला, हे यातून स्पष्ट होते. त्यातच तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर आणि घरातही महिला सुरक्षित नाही, असे दिसून येते. एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या ४८ वर्षीय काकूची हत्या केली, कारण तिने त्याच्या सोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.
डोके भिंतीवर आपटले
कोडुंगैयूरमध्ये राहणाऱ्या ऑगस्टिन अरुण (वय २१) तो त्याच्यासोबत त्याचा मित्र सोलोमन (२२) हे दोघे आपल्या काकूच्या घरी आले. या तरूणाला ४८ वर्षीय काकू सोबत त्याला शरीर संबंध ठेवायचे होते. त्याच्या या मागणीला काकूने नकार दिला, यामुळे रागाच्या भरात त्या नराधम पुतण्याने तिचे डोके भिंतीवर आदळले. यानंतर ती वेदनेने विव्हळत असताना तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा पुन्हा तिचे डोके भिंतीवर आदळून तिला ठार केले. हा नराधम तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर काकूच्या मृतदेहाला वाईट पध्दतीने स्पर्श केले. यानंतर तो नराधम आणि त्याचा मित्र तिथून फरार झाले. मात्र पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
असे झाले उघड
काकू घरी एकटीच होती. दुपारी तीन वाजता ऑगस्टिन व त्याचा मित्र आले होते. तिने या दोघांना चहा, नाश्ता दिला व ती आतल्या खोलीत गेली. ऑगस्टिनने मागून जात तिला मिठीत घेतले. हा प्रकार बघून काकू महिला घाबरली. पुतण्या अशाप्रकारे गैरवर्तन करत असल्याने तिने त्याला विरोध केला. महिलेने विरोधा केला तेव्हा त्याने तिला लैगिंक संबंध ठेवण्यासाठी आग्रह ठरला, तसेच तो अश्लिल बोलू लागला. यावेळी महिलेने रागात त्याला तिथून जाण्यास सांगितले. तू येथून गेला नाहीस तर ही घटना आई-वडिलांना आणि नातेवाईकांना सांगेल, अशी धमकी काकूने दिली. यामुळे ऑगस्टीनने तिला मारहाण केली आणि तिचे डोके भिंतीवर आदळले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांना ताब्यात घेतले आहे.