इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘जाको राखे सैयां…मार से ना कोई’ याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. असाच अनुभव तमिळ चित्रपट अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी याने घेतला आहे. विशाल हा स्वतः मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे. तामिळ चित्रपटांचा सुपरस्टार असलेल्या विशालने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या आगामी ‘मार्क अँटोनी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओद्वारे त्याने त्याच्या चाहत्यांना साक्षात यमराजच पाहिल्याचा खुलासा केला आहे. विशालने शेअर केलेला हा भितीदायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विशाल कृष्णा रेड्डी याने त्याच्या ट्विटर हँडलवर ‘मार्क अँटोनी’च्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्यासोबत मोठा अपघात झाल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. चाहत्यांसोबत व्हिडिओ शेअर करताना विशालने लिहिले की, ‘देवाने माझे प्राण काही सेकंद आणि काही इंचांनी वाचवले. देवाचे अनेक आभार. या घटनेने मी हैराण झालो आहे आणि आता माझ्या पायावर आणि शूटवर परतलो आहे.
या व्हिडिओमध्ये ‘मार्क अँटनी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सेटवरील संपूर्ण कलाकार आणि क्रू शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटात हाणामारीचे एक दृश्य आहे. त्यात ट्रकचाही वापर केला जात होता. हा ट्रक भिंत तोडून बाहेर येतो, असे दृष्य दाखविण्यात येणार होते. मात्र, अचानक हा ट्रक अनियंत्रित झाला. त्यामुळे तो भरधाव वेगाने चालत राहिला. त्यामुळे सेटवर चेंगराचेंगरी झाली. विशालचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच चाहते अभिनेत्याच्या कुशलतेसाठीही प्रार्थना करत आहेत.
https://twitter.com/VishalKOfficial/status/1628369227693580290?s=20
Tamil Film Shooting Accident on Set Horrible Video