रविवार, जुलै 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

by Gautam Sancheti
जुलै 3, 2025 | 3:57 pm
in स्थानिक बातम्या
0
State Fencing Championship Nashik Team. 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– छत्रपती संभाजी नगर येथे मिनी आणि चाईल्ड कप तलवारबाजी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करून सर्वसाधारण तिसऱ्या क्रमांकाचा चषक पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या २८ जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता. नाशिकच्या २५ खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगली कामगिरी करत रजत आणि कास्य पदकांची कमाई केली.

१२ वर्षे वयोगटात मुलांमध्ये शौर्य यादव याने फॉईल या प्रकारात कांस्यपदक मिळविले. याच गटात सॅबर प्रकारात विदित पवार आणि फॉईल प्रकारात चिरायु पटेल यांनी कांस्य पदके मिळविली. ह्रिदयांशु परदेशी आणि प्रणव डेर्ले यांनी कास्य पदके मिळविली. अंशुमन सोळंकी यानेही चांगला खेळ करत ई.पी. प्रकारात कांस्यपदक मिळविले.

मुलीच्या १२ वर्षे गटामध्ये अनन्न्या सुळे हीने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून फॉईल या प्रकारात रजत पदकाला गवसणी घातली. तर याच गटात सॅबर प्रकारात शरण्या डेर्ले हीने कास्य पदक मिळविले. आराध्या कुंभार आणि मोक्षिता केसरकर यांनी फॉईल प्रकारात कांस्यपदक मिळविले. तर आराध्या ओंबळेनेही कास्य पदक मिळविले. १० वर्षे गटात मुलांमध्ये शाहू पाटील याने याने फॉईल प्रकारात कास्य पदक मिळविले.

१० वर्षे गटात मुलींमध्ये अन्विता ताजने हीने रजत पदक तर शरण्या पारीख हीने कास्य पदक मिळविले. याच गटामध्ये फॉईल प्रकारात ग्रीष्मा पाटीलने आणि स्वानंदी खोकलेने सॅबर प्रकारात कांस्य पदके मिळविली. रेवा पाटील हीने ई.पी. प्रकारात कांस्यपदक मिळविले. या सर्व खेळाडुंना क्रीडा प्रशिक्षक अजिंक्य दुधारे, जय शर्मा, राहूल फडोळ, प्रसाद परदेशी, आनंद चकोर यांचे मार्गदर्शन लाभले. नाशिकच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून पदक प्राप्त केल्याबद्दल नाशिकचे क्रीडाप्रेमी मान्यवर अजित दान, राहुल देशमुख, चंद्रशेखर सिंग, हेमंत पांडे, केशवअण्णा पाटील, अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

Next Post

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
bjp11

विशेष लेख....नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी महत्वाच्या कामांकडे लक्ष द्यावे, जाणून घ्या, सोमवार, २८ जुलैचे राशिभविष्य

जुलै 27, 2025
FB IMG 1753625870303

अखेर सुनील बागुल व मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 27, 2025
KIA Logo

किया इंडियाने सर्टिफाईड प्री-ओन्‍ड नेटवर्क १०० आऊटलेट्सपर्यंत वाढवले

जुलै 27, 2025
IMG 20250727 WA0342 1

नाशिकरोडला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

जुलै 27, 2025
kanda 11

राज्य सरकारला खरोखरच कांदा धोरण ठरवायचे आहे का? कांदा संघटनेचा सरकारला सवाल

जुलै 27, 2025
alert1

राज्यातील या भागात ऑरेंज अलर्ट…सतर्क राहण्याच्या सूचना

जुलै 27, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011