नाशिक – नाशिक मध्ये प्रथमच तालवाद्य कार्यशाळा होणार आहे. मुंबई येथील स्वरांकित संस्थेद्वारे आयोजित ही तालवाद्य कार्यशाळा ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ३ या वेळात सार्वजनिक वाचनालय हॉल येथे होणार असल्याची माहिती संयोजक ऋषिकेश कुलट त्यांनी दिली. कार्यशाळेमध्ये ढोलक, ढोलकी, तबला, पखवाज, ड्रमसेट, दिमडी, मादल, डफ, चंडा, ढोल, घुंगरू, झांजरी, टाळ, या ताल वाद्यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे. प्रवेश मर्यादित असल्याने आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 9922809090 या भ्रमणध्वनीवर नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.