नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८४ हजार ६८८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ७५८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.३६ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १८३ रुग्णांची वाढ
– २८५ रुग्ण बरे झाले
– ७ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार १६५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –९११
जिल्हया बाहेरील रुग्ण – ८
एकूण २ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०५
बागलाण – ६३
चांदवड – ७२
देवळा – १५
दिंडोरी – ८७
इगतपुरी – १९
कळवण – २६
मालेगांव ग्रामीण – ७४
नांदगांव – ४७
निफाड – १३२
पेठ – ०
सिन्नर – २४५
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – २२
ग्रामीण भागात एकुण ९११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ३७८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार २३० रुग्ण आढळून आले आहेत.