नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार ५०३ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार ४० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४.३७ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३९५ रुग्णांची वाढ
– ३२९ रुग्ण बरे झाले
– २७ जणांचा मृत्यू आज
– आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु – ३३३
(नाशिक मनपा-११२,मालेगाव मनपा- १०, नाशिक ग्रामीण-२११, जिल्हा बाह्य- ०)
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ७८१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १३१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २ हजार ४१२
जिल्हया बाहेरील रुग्ण – २
एकूण ४ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २२८
बागलाण – १४८
चांदवड – २४२
देवळा – ८३
दिंडोरी – २०७
इगतपुरी – ३१
कळवण – ८०
मालेगांव ग्रामीण – १४०
नांदगांव – ८३
निफाड – ४०९
पेठ – ४
सिन्नर – ६८७
सुरगाणा – ६
त्र्यंबकेश्वर – ०
येवला – ६४
ग्रामीण भागात एकुण २ हजार ४१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ५ हजार ९२० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९० हजार ७४९ रुग्ण आढळून आले आहेत.