काबूल – तालिबानची सत्ता येताच विविध प्रकारचे फतवे सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील सलून दुकानदारांसाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सलूनमध्ये आता दाढी करता येणार नाही. असे केल्यास इस्लामिक कायद्याचा तो भंग ठरणार आहे. तसेच, स्टाईलिश प्रकारची कटींगही करता येणार नाही. यासंदर्भात सलून व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली असून त्यांना सर्व नियम समजावून सांगण्यात आले आहेत. सलूनमध्ये संगीत वाजविण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या नियमांविरोधात कुठेही तक्रार करता येणार नाही. त्याचे कसोशीने पालन करावे लागले. ग्राहकांमध्येही भीतीचे वातावरण असल्याचे सलून मालकांचे म्हणणे आहे.