इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तालिबानी हे नाव ऐकल्यावर संपूर्ण जगात अशी एकही व्यक्ती नसेल जिच्या डोळ्यापुढे बंदुकधारी दहशतवादी येणार नाही. तालिबानी खरं तर एक वृत्ती आहे. त्यामुळे जगभरात दहशत पसरविण्यासाठी कुख्यात असलेल्या तालिबान्यांच्या हातून एखादी क्रिएटीव्ह गोष्ट घडावी, याची अपेक्षाच कुणी करू शकत नाही. पण अफगाणिस्तानमध्ये अगदी त्याच्या उलट घडलं आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा वापर करून जगावर हल्ला करणाऱ्या तालिबान्यांनी चक्क एक सूपरकार तयार केली आहे. सध्या या कारची जगभर चर्चा सुरू आहे. तालिबानचं शासन असलेल्या अफगाणिस्तानातील इंजीनियर्सने पहिल्यांदाच एका सुपरकारचं अनावरण केलं आहे. MADA-9 असे या कारचे नाव असून जवळपास तीस इंजिनियर्स या कारच्या निर्मितीसाठी राबले आहेत. मुख्य म्हणजे तालिबान्यांच्या राजवटीत तयार झालेली ही पहिली सूपरकार आहे. तालिबानचा उच्च शिक्षण मंत्री अब्दूल बाकी हक्कानी यानेच या कारचे अनावरण केले. संयुक्त राष्ट्रातील अफगाणिस्तानचा राजदूत सुहेल शाहीन याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या कामाचं कौतुक केलं आहे. त्याने कारचा व्हिडियो शेअर केला आहे. अफगाणी तरुणांनी अफगाणिस्तानच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.
५० हजार डॉलरचा खर्च
या सूपरकारच्या निर्मितीसाठी ४० ते ५० हजार डॉलर्सचा खर्च आला आहे. अर्थात अजून या कारमध्ये बरच काम बाकी आहे, असेही सांगण्यात आले आहे. या कारमध्ये १.८-लिटर इंजिन वापरण्यात आले असले तरीही ते सूपरकारच्या दृष्टीने पॉवरफूल्ल नाही. टोयोटा कोरोलाचे फोर-सिलिंडर या कारमध्ये वापरण्यात आले आहे.
The Taliban designed a new sports car. Take that, Elon Musk! pic.twitter.com/szFWGE6yWs
— Nina ? Byzantina (@NinaByzantina) January 14, 2023
Talibani Indigenously Manufacture Supercar Features