मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटीचा मुख्य आरोप गणेश गुसिंगे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, गुसिंगे याने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेली भरती परीक्षा दिली होती. त्यात तो पास झाला आहे. त्याला १३८ गुण मिळाले आहे. गणेश गुसिंगे हाच पिंपरी चिंचवड पोलिस भरती आणि म्हाडाच्या पेपर फुटीमध्येही आरोपी आहे. हायटेक कॉपी करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. डीएमईआरच्या परीक्षेत त्याने एवढे गुण मिळविल्याने त्याच्यावरील संशय आणखी बळावला आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ही भरती परीक्षा प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ, औषधनिमार्ता अशा विविध ५१८२ पदांसाठी होती. या परिक्षेत गुसिंगे याला २०० पैकी १३८ गुण मिळाले आहे. या परिक्षेतही गणेश गुसिंगे यांनी गैरप्रकार करुन गुण मिळवले का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
नाशिकमध्ये तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर हा निकाल आला आहे. गुसिंगे हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्या प्रकरणात फरार आरोपी आहे. पण, या प्रकरणात त्याला अद्याप पर्यंत अटक झालेली नाही. पण, नाशिकमध्ये तो गजाआड गेला. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि हायटेक कॉपी करण्यामध्ये एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहे.
गणेश गुसिंगे हा मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असून नाशिकमध्ये त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचे फोटोही मिळून आले. अशा या आरोपीला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत १३८ गुण मिळाले आहे.
The main accused in the paper leak got 138 marks in the recruitment exam
Genesh Gusinge Talathi Exam High tech Copy Case Accused Ganesh Gusinge Marks