इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलरची गळा चिरून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. ज्या पद्धतीने हे हत्याकांड घडवण्यात आले आहे, ते पाहता देशाच्या सुरक्षा यंत्रणा याला दहशतवादी घटना म्हणून घेत आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचाही सहभाग समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे.
उदयपूरमध्ये आज भरदिवसा एका टेलरची गळा चिरून हत्या करण्यात आली. नुपूर शर्माच्या बाजूने फेसबुक पोस्ट केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे, ती क्रूरतेचा कळस आहे. आतापर्यंत ISIS या दहशतवादी संघटनेकडून अशा प्रकारे गळा चिरण्याचे व्हिडिओ समोर येत होते. मारेकऱ्यांची ही पद्धत पाहता सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. ANI च्या वृत्तानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उदयपूरला रवाना झाली आहे.
व्हिडिओ देखील बनवला
ही घटना घडवताना आरोपीने व्हिडीओही बनवला आणि नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हत्येची कबुली दिली. काही वेळातच हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. ही बाब समोर येताच सर्व जबाबदार लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल करू नये, असे आवाहन केले. त्याचबरोबर खुद्द मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही यासंदर्भात जनतेला आवाहन केले आहे. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण राजस्थानमध्ये पुढील २४ तास इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
tailor killed in Udaipur Rajasthan terrorist 2 peoples arrested