सटाणा – ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या प्रोसिडिंग बुक मधील पाने बदलून मासिक सभेतील ठराव बदलल्याने तत्कालीन ग्रामसेवक व यातील दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी सत्ताधारी गटाने जिल्हा परिषेदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या कडे केली आहे गेल्या तीन महिन्यापासून चौकशीची ग्रहण लागलेल्या ताहाराबाद ग्रुप पंचायतीचे प्रोसिडिंग बुक गेल्या आठवड्यात तत्कालीन ग्रामसेवक स्वप्नील ठोके यांनी बदली झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्याच्या कालावधीने विद्यमान ग्रामसेवक के.एस. पवार यांच्याकडे जमा केले आहे. प्रोसिडिंग बुक मध्ये पाने बदलून ठराव बदलल्याचे निदर्शनास आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ३१ मे रोजी झालेल्या मासिक बैठकीत विरोधी सदस्य गटाशी संगनमत करत तत्कालीन ग्रामसेवक स्वप्निल ढोके यांनी ठराव क्रमांक पाच बदलून त्या ठिकाणी १५ वित्त आयोग खर्चाबाबत ठराव टाकला आहे ठरावामुळे सत्ताधारी गटाच्या सदस्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झालेला दिसून येत आहे. मात्र असा कुठलाही ठराव या बैठकीत झालाच नव्हता ठरावा साठी सत्ताधारी व विरोधी गटातील कुठल्याही सदस्याने संपूर्ण बैठकीत गदारोळ केलेला नसून,ग्रामसेवक स्वप्निल ठोके यांनी सरपंच यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून केलेला भ्रष्टाचाराच्या बचावापोटी विरोधकांना हाताशी धरून प्रोसिडिंग बुक मधील ठरावात फेरफार केला आहे.याबाबत ठोस पुरावे मिळून आल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला आहे.
३१ मे २०२१ च्या मासिक बैठकीचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून सत्य पडताळणी करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे यांची समक्ष भेट घेऊन केली असता याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रोसेडींग बुकच्या पान क्रमांक १ ते १९ वरील ठराव बरोबर असून पुढील सर्व ठरावात खाडाखोड केलेले दिसुन येत आहेत हे ठराव लिहितांना पेनाचा बदल,शाहीचा बदल,३१ मे च्या सभेतील विषय क्रमांक ५,६,७ मध्ये खाडाखोड केलेली आहे.शेवटच्या पानावर देण्यात आलेल्या दाखल्यात सरपंच यांची स्वाक्षरी घेण्यात आलेली नाही.दाखल्यावरील पान क्रमांकात खाडाखोड केलेली आहे. प्रोसेडींग बुक मध्ये झालेल्या चुका जाणूनबुजून केल्याचे दिसून येत असल्याचा प्रथमदर्शनी अहवाल गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे यांनी दिला असून, सदर प्रकार अतिशय गंभीर असल्याने याच्या चौकशी साठी सहायक गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी आर.एम. सुर्यवंशी,नितीन देशमुख,पाटील यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.ग्रामपंचायतीची एका बाजूला चौकशी सुरू असताना प्रोसेडींग बुक मध्ये फेरफार कोणत्या उद्देशाने करण्यात आला,याची सखोल चौकशी करून दोषीं ग्रामसेवकावर कार्यवाही करण्याची मागणी सत्ताधारी गटाच्या सरपंच शीतल नंदन,उपसरपंच जीवन माळी,सदस्य सीताराम साळवे,प्रीती कोठावदे,निखिल कासारे,राजेश माळी,जिजाबाई वणीस,ज्योती माळी,भारती सोनवणे यांनी केली आहे.