शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचा ट्रॅव्हल एक्स्पो या तारखेपासून…ही आहे एक्स्पोची वैशिष्ट्ये

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 12, 2025 | 5:04 pm
in स्थानिक बातम्या
0
TAAN LOGO

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मधील ट्रॅव्हल व्यावसायिकांची संस्था ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) तर्फे 14 , 15 व 16 फेब्रुवारी रोजी ट्रॅव्हल संदर्भातील सर्वच माहिती एका छताखाली उपलब्ध होण्यासाठी उपयुक्त अशा हॉलिडे कार्निव्हल अर्थात ट्रॅव्हल एक्स्पोचे आयोजन कॉलेज रोड येथील गुरुदक्षिणा हॉल येथे करण्यात येत असल्याची माहिती तान चे अध्यक्ष सागर वाघचौरे यांनी दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष मनोज वासवानी ,सचिव अरुण सूर्यवंशी , तसेच कमिटी सदस्य अमित चंडेल ,ईशान जोशी , अंबरीश मोरे हे मान्यवर उपस्थित होते

सागर वाघचौरे म्हणाले की देशविदेशातील पर्यटनासाठी नाशिककर नेहमीच उत्सुक असतात. धकाधकीच्या आयुष्यात पर्यटन हे कुटुंबासाठी एकत्रित वेळ घालविण्यासाठी आणि मानसिक आनंदासाठी अत्यंत उपयुक्त आहे. देशातील जीडीपी तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारमध्ये पर्यटन क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे.

नाशिक हून देशविदेशात जाणारे तसेच देशविदेशातून नाशिक मध्ये येणारे पर्यटक यांना सर्व सेवा पुरविण्याचे कार्य तान चे सदस्य असलेले ट्रॅव्हल व्यावसायिक करत असतात. हे ट्रॅव्हल व्यावसायिक आपला अनुभव आणि संपर्क यांचा उपयोग करून एक विश्वासार्य सेवा प्रदान करत असून तो अडीअडचणी च्या वेळेस तत्परतेने उपलब्ध असल्याचे देखील त्यांनी नमूद केले

या तीन दिवसीय एक्स्पो मध्ये नाशिक मधील ६० हून अधिक ट्रॅव्हल व्यावसायिक सहभागी होत आहेत.
ट्रॅव्हल एक्स्पोची वैशिष्ट्ये –
1)सहलीबाबत अधिक माहितीसाठी वैयक्तिक चर्चेची संधी
2)आकर्षक डील्स व डिस्काऊंटस
3)देशविदेशातील प्रत्येक पर्यटन स्थळांसाठी परवडणारे पॅकेजेस्
4)व्हिसा ,हवाई तिकीट ,फॉरेन करन्सी ,बॅगेज ,पासपोर्ट याबाबत मार्गदर्शन

नाशिक चे पर्यटन , ब्रॅण्डिंग या विषयात कार्य करणाऱ्या तान तर्फे विविध उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात . या मध्ये डेस्टिनेशन ट्रेनिंग, अभ्यास सहली आणि तानच्या व्यावसायिक फॅम टूर्स ,एजंट्स लॉगिंनस पोर्टल साठी D M C / एअरलाईन्स समवेत पर्यटन व्यावसायिक व कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग,व्यावसायिकांचे सक्षमिकरण,(self empowerment).ट्रॅव्हल एक्स्पो, N T M ,( नासिक ट्रॅव्हल मार्ट) रोडशोज चे आयोजन, नवनवीन तंत्रज्ञानाचे वेळोवेळी मार्गदर्शन हे काही प्रमुख आहेत

प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ९ अशी असून प्रदर्शना दरम्यान अनेक ज्ञानवर्धक सेमिनार देखील आहेत. ग्राहकांसाठी देश विदेशातील पर्यटनाचे असंख्य पर्याय , अनेक ऑफर्सचा लाभ तसेच रोज आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देखील नाशिककरांना मिळणार आहे. या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन तान तर्फे करण्यात आले आहे.

टूर प्लॅन करताय…..?
पर्यटकांनी आपल्या सहलीचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी ट्रॅव्हल एजंटस् असोसिएशन ऑफ नाशिक (तान) या पर्यटन व्यावसायिकांचे असोसिएशन चा अधिकृत सदस्य असलेल्या ट्रॅव्हल कंपनीचीच निवड का करावी ???

१) आपल्या शहरातील निवासी असणाऱ्या ट्रॅव्हल एजंटचे एक निश्चित ठिकाण व स्वतःचे ऑफिस असते.

२) तान सभासदांचा असलेला संपर्क आणि त्याचा या क्षेत्रातील अनुभव यामुळे पर्यटकांना योग्य ट्रॅव्हल्स प्लॅन व माहिती मिळते.

३) सहलीमध्ये अचानक काही अडचण आल्यास आपण त्वरित थेट संपर्क करू शकता व त्यायोगे अडचणीतून त्वरित मार्ग काढणे शक्य होते. (यासाठी कॉल सेंटरला फोन करून वेटिंग वर राहण्याची गरज नाही.)

४. ट्रॅव्हल् एजंटस् असोसिएशन ऑफ नाशिक (तान) चा सदस्य असणे म्हणजे तो ट्रॅव्हल एजंट अधिकृत तसेच नियमितरित्या या व्यवसायात आहे याची खात्री असते.

५) ऑनलाइन पोर्टलवर वेगवेगळ्या ऑफर असतात मात्र त्यात अनेक छुपे नियम / अटी/ चार्जेस असतात . ते प्रथमदर्शनी दिसून येत नाहीत. या तुलनेत ट्रॅव्हल एजंट योग्य आणि परफेक्ट मार्गदर्शन करू शकतो.

६) आपल्या सहली दरम्यान काही नैसर्गिक आपत्ती, संप , इत्यादि मुळे अडचणी आल्यास आपल्या ट्रॅव्हल एजन्ट सोबतच शहरातील अजून इतर अनेक ट्रॅव्हल कंपनीचे अनुभवी पर्यटन व्यवसायिक आपल्या मदतीला धावून येतात . या संघटीत एकतेचा ग्राहकाला फायदा होतो. तसेच शासकीय मदतीची गरज पडल्यास तान सभासदामागे एक अधिकृत, सरकार-मान्य संस्था उभी असते, ज्यामुळे सरकारी मदत आपल्या पर्यंत तातडीने पोहोचू शकते. तसेच त्या त्या शहरातील स्थानिक ट्रॅव्हल एजंट, होटेलियर्स यांचे माध्यमातून लागलीच मदत उपलब्ध होऊ शकते.

७) आपली सहल/यात्रा सुखकर व्हावी यासाठी आपल्या नजीकच्या तान सभासदाशी संपर्क साधा आणि ऑनलाईन पोर्टल, तान शी रजिस्टर नसलेले ट्रॅव्हल एजंट यापासून होणारी फसवणूक टाळा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येत्या १५ दिवसांत भाजपाचे आणखी इतक्या लाख सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य…उद्यापासून हे नेते महाराष्ट्र दौऱ्यावर

Next Post

दुस-या मजल्यावरून पडल्याने पेंटरचा मृत्यू….औद्योगीक वसाहत भागातील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime 13

दुस-या मजल्यावरून पडल्याने पेंटरचा मृत्यू….औद्योगीक वसाहत भागातील घटना

ताज्या बातम्या

fir111

ट्रान्स्पोर्ट कार्यालयात शिरून व्यावसायीकाकडे खंडणीची मागणी…तीन जणांवर गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
GxzEy8PW4AAqB 7

आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…खा. नरेश म्हस्के यांचे हे ट्वीट चर्चेत

ऑगस्ट 8, 2025
rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
crime11

वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी अनेकांचे बँक खाते केले रिकामे…आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011