इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारतावर दणदणीत विजय मिळविला आहे. भारतीय संघाने दिलेले १६९ धावांचे आव्हान इंग्लंडने सहज पार केले. इंग्लंडच्या सलामीवीरांनीच विजयश्री खेचून आणली. सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी १६ षटकातच १७० धावा करुन इंग्लंडला अंतिम फेरी गाठून दिली. बटलरने ८० तर हेल्सने ८६ धावा केल्या. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
भारताच्यावतीने विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने शानदार खेळी केली. दोघांनीही अर्धशतक झळकावले. त्यामुळेच भारताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली आहे. आजच्या सामन्यात विजयी झालेला इंग्लंड संघ आता अंतिम फेरीत पाकिस्तान संघाला आव्हान देणार आहे.
सर्वप्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघ मैदानात उतरला. सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी खेळ सुरू केला. पण, लोकेश राहुल लवकर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरुन धावा वाढविण्याचा प्रयत्न केला. पण, रोहित शर्मा २७ धावा केलेल्या असतानाच बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आला. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, तो एक चौकार आणि एक षटकार खेतून अवघ्या १४ धावांवरच परतला. सूर्यकुमार नंतर हार्दिक पांड्या मैदानात आला. विराट आणि पांड्या यांनी जोरदार फटकेबाजी सुरू केली. त्यामुळेच भारतीय संघाने १०० धावांचा टप्पा ओलांडला. विराट आणि पांड्याने शानदार खेळी करीत अर्धशतक झळकावले. भारताने २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या. इंग्लंडच्यावतीने आदिल रशीद, ख्रिस वोक्स आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
To the MCG in style ?
England make it to their second Men's #T20WorldCup final in three editions ? #INDvENG pic.twitter.com/llz20I6nRe
— ICC (@ICC) November 10, 2022
T20 WorldCup Semi Final India Vs England Match