इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय संघाला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. या मानहानीकारक पराभवाने भारताचे पुन्हा एकदा विजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, स्पर्धेतून बाहेर पडूनही भारतीय संघावर कोट्यवधींचा वर्षाव होणार आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आयसीसीने स्पर्धेच्या बक्षिसांची घोषणा केली होती. या स्पर्धेत एकूण ५.६ दशलक्ष डॉलर बक्षीस रक्कम वितरित केली जाईल. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे ४५.६७ कोटी आहे. भारताला किती कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल ते आता आपण जाणून घेऊया…
भारत आणि न्यूझीलंडला मिळणार एवढे कोटी
भारताव्यतिरिक्त, केन विल्यम्सच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ देखील टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक संघाला ०.४ दशलक्ष डॉलर (अंदाजे ३ कोटी २६ लाख रुपये) बक्षीस रक्कम दिली जाईल. दुसरीकडे, विजेते आणि उपविजेत्यांवर अधिक पैशांचा पाऊस पडेल.
विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला
पाकिस्तान आणि इंग्लंडने यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हे दोन्ही संघ १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर विजेतेपदासाठी लढतील. स्पर्धेतील विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर (अंदाजे १३ कोटी रुपये) बक्षीस मिळेल, तर अंतिम फेरीत पराभूत होणारा संघ त्यांच्यासोबत ०.८ दशलक्ष डॉलर (अंदाजे 6.5 कोटी रुपये) घेईल.
इतर संघांवरही पैशांचा पाऊस
यंदाच्या विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी झाले होते आणि प्रत्येक संघाला बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला होता. या बक्षीसांमध्ये सुपर१२ मध्ये पोहोचणाऱ्या सर्व संघांसह पहिल्या फेरीतून बाहेर पडलेल्या संघांनाही ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला वेगळे पैसेही मिळतील.
टी२० विश्वचषक २०२२ बक्षीस रकमेची यादी अशी
विजेता – १.६ दशलक्ष डॉलर (अंदाजे रु. १३ कोटी)
उपविजेता – ०.८ दशलक्ष डॉलर (अंदाजे ६.५ कोटी)
उपांत्य फेरीत पराभूत झालेले संघ – ०.४ दशलक्ष डॉलर (अंदाजे ३.२६ कोटी)
सुपर १२ मध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला – ४० हजार डॉलर (अंदाजे ३३.६२ लाख)
सुपर 12 मधून बाहेर पडलेला प्रत्येक संघ – ७० हजार डॉलर (सुमारे ५७.०९ लाख)
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ – ४० हजार डॉलर्स (अंदाजे ३३.६२ लाख रुपये)
पहिल्या फेरीतून बाहेर पडणारा प्रत्येक संघ – ४० हजार डॉलर्स (अंदाजे ३३.६२ लाख रुपये)
T20 WorldCup Indian Cricket Team Prize Amount