मुंबई – दुबईमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेत आता रंगत वाढली आहे. प्रारंभीच्या सामनात भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धे संघ आमने-सामने आले. त्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धही भारताला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. विश्वचषकातील पहिले दोन्ही सामने भारताने गमावले आहेत. आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. त्यामुळे भारत हा अफगाणिस्तानचा किती मोठ्या फरकाने पराभव करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हा सामना केव्हा सुरू होणार आहे, तो संपूर्ण कुठे पहायला मिळेल यासह अनेक प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत. त्याचीच माहिती आपण घेणार आहेत.
सामना किती वाजता
आज सायंकाळी ठीक ७.३० वाजता
सामना कुठे खेळला जात आहे
शेख जाएद स्टेडिअम, आबुधाबी
थेट प्रक्षेपण या चॅनल्सवर
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स ३ या चॅनल्सवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारण होणार आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1455054801033736198
ऑनलाईन लाइव्ह स्ट्रीमिंग
भारत-पाक सामन्याचे ऑनलाईन लाॉईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ आणि हॉटस्टारवर ऑनलाईनवर पाहता येणार आहे.
दूरदर्शनवर प्रक्षेपण
सर्व क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे, भारताचे सर्व सामने, उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांचे डीडी फ्री डिशवर तसेच डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर थेट प्रसारण केले जाईल. २३ ऑक्टोबरपासून आकाशवाणी हिंदी आणि इंग्रजी भाषेतून सर्व सामन्यांचे समालोचन थेट प्रसारण सुरू झाले आहे.
आकाशवाणीवरही
आकाशवाणीवरून भारताचे सामने, उपांत्य सामने आणि अंतिम सामना 66 पेक्षा जास्त प्राथमिक चॅनेल ट्रान्समीटर्स, एफएम रेनबो नेटवर्क, 86 एलआरएस स्टेशन्स, 12 एफएम रिले ट्रान्समीटर्स, डीटीएच आणि डीआरएमवरून प्रसारित करेल. एलआरएस, एफएम रिले ट्रान्समीटर, डीटीएच आणि डीआरएमवर भारत खेळणार नसलेले सामने प्रक्षेपित केले जातील.
कार्यक्रमांची मेजवानी
दूरदर्शनवर टी 20 विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहणे हा अधिक रोमांचक अनुभव असेल कारण डीडी स्पोर्ट्सने लोकसहभागासह विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. ‘क्रिकेट लाइव्ह’ नावाच्या शोमध्ये, ‘पब्लिक का कप्तान’ अंतर्गत सामान्य लोकांना कर्णधाराची टोपी घालायला आणि कर्णधार म्हणून महत्त्वाचे निर्णय घेण्यास सांगितले जाईल. ‘आरजेज का क्रिकेट फंडा’ हा आणखी एक मनोरंजक टॉक शो आहे ज्यात क्रिकेट तज्ञांसह ऑल इंडिया रेडिओ जॉकी डीडी स्पोर्ट्सवर लोकांशी संवाद साधतील. प्रसार भारतीमधील नाविन्यता यातून दिसणार असून टीव्ही आणि रेडिओ समन्वयाचे हे उत्तम उदाहरण आहे.