मुंबई – इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलनंतर आता क्रिकेटरसिकांसाठी जबरदस्त महासंग्रामाची पर्वणी आजपासून मिळणार आहे. ती म्हणजे टी२० विश्वचषकाची. १७ ऑक्टोबरपासून या चषकाला प्रारंभ झाला असला तरी सुपर १२चे सामने आजपासून सुरू होत आहेत. आज पहिल्याच दिवशी ग्रुप १ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड हा सामना होणार आहे. तर, पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान हे संघ उद्या एकमेकाला भिडणार आहेत. जवळपास महिनाभर म्हणजे १४ नोव्हेंबर पर्यंत क्रिकेटचा हा थरार कायम राहणार आहे. हा विश्वचषक आखाती देशात होत आहे. बघा, सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे