दुबई – टी२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. भारताचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. तर, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. येत्या १० आणि ११ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. १० नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचा पहिला सामना होईल. त्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने येतील. तर, ११ नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होईल. या दोन्ही सामन्यांमधील विजेते हे अंतिम फेरीत दाखल होतील.