बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

टी२० विश्वचषकातील सेमी फायनलची पहिली टीम ठरली; या संघाने मारली बाजी

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 4, 2022 | 2:53 pm
in संमिश्र वार्ता
0
Fgs ZnRWQAIUsxF

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टी२० विश्वचषक २०२२ सुपर १२ मधील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडचा ३५ धावांनी पराभव केला. या विजयासह केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने २०२२ च्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आयर्लंडच्या पराभवासह, किवी संघाचे आता ५ सामन्यांतून ७ गुण झाले आहेत आणि न्यूझीलंड हा सुपर १२ मधील पहिला संघ आहे, ज्याने २०२२2 च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. संघ अद्याप अधिकृतपणे पात्र ठरला नसला तरी, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक सामना असल्याने आणि या संघांनी आपापले सामने जिंकल्यास निव्वळ धावगती पाहिली जाईल. न्यूझीलंडच्या संघाचा निव्वळ धावगती +२.११३ असेल, जी ऑस्ट्रेलिया (-०.३०४ ) आणि इंग्लंड (+०.५४७) पेक्षा खूपच चांगली आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला आहे.

आयर्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात चांगली सुरुवात करूनही आयर्लंडला २० षटकांत ९ गडी गमावून १५० धावाच करता आल्या. १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाने दमदार सुरुवात केली आहे. पॉवरप्लेमध्ये संघाने ६ षटकांत एकही विकेट न गमावता ३९ धावा केल्या. दरम्यान, २५ चेंडूत ३० धावा केल्यानंतर बालबर्नी क्लीन बोल्ड झाला आहे. मिचेल सँटनरने त्याला बाद केले. पहिला विकेट पडल्यानंतरही आयर्लंडच्या विकेट्स पडत राहिल्या. आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंगने ३७ धावा केल्या. कर्णधार बलबर्नी ३० धावा करून बाद झाला. जॉर्ज डॉकरेलने २३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकीने ३, साऊथी, सँटनर, सोधीने २-२ बळी घेतले.

तत्पूर्वी, फॉर्ममध्ये परतलेल्या केन विल्यमसनने ३५ चेंडूत ६१ धावा केल्या, परंतु आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने शुक्रवारी टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडला ६ बाद १८५ धावांवर रोखून संस्मरणीय हॅट्ट्रिक साधली. विल्यमसनने स्पर्धेत प्रथमच शंभरच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि तीन षटकार मारले.

सलामीवीर फिन ऍलनने १८ चेंडूत ३२, ग्लेन फिलिप्सने नऊ चेंडूत १७ आणि डॅरिल मिशेलने २१ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज लिटिलने डेथ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडचा रनरेट रोखला. १९व्या षटकात त्याने सलग तीन चेंडूंवर विल्यमसन, जिमी नीशम आणि मिचेल सँटनरचे बळी घेतले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विल्यमसनला झेलबाद झाला तर नीशम आणि सॅंटनर लेग बिफोर बाद झाले. संयुक्त अरब अमिरातीच्या कार्तिक मयप्पननंतरची ही विश्वचषकातील दुसरी हॅट्ट्रिक ठरली. कार्तिकने श्रीलंकेविरुद्ध हा पराक्रम केला.

न्यूझीलंडच्या डावातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विल्यमसनचे फॉर्ममध्ये परतणे. सुरुवातीला संघर्ष केल्यानंतर तो मुक्तपणे खेळला. त्याने वेगवान गोलंदाज बॅरी मॅकार्थीला डीप मिडविकेटवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोन चेंडूंनंतर त्याने त्याच जागी आणखी एक षटकार मारला. पुन्हा असाच फटका खेळण्याच्या प्रयत्नात १९व्या षटकात तो झेलबाद झाला. न्यूझीलंड एकेकाळी २०० धावांचा टप्पा ओलांडू पाहत होता पण शेवटच्या दोन षटकात आयर्लंडने केवळ १२ धावा दिल्या.

T20 World Cup Semi Final First Team
New Zealand

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शालेय शिक्षणाच्या कामगिरीत महाराष्ट्राची आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप

Next Post

आमदार आणि खासदार निधीबाबत भाजपचा मोठा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
IMG 03

आमदार आणि खासदार निधीबाबत भाजपचा मोठा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011