मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकाची सुरुवात या आठवड्यात होत आहे. १७ ऑक्टोबरपासून ते १४ नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेचे आयोजन यूएई आणि ओमान येथे केले जात आहे. या स्पर्धेत पाकिस्तानी संघाच्या जर्सीवर इंडिया असे नाव लिहिले आहे. हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटेल परंतु अशी जर्सी परिधान करणे पाकिस्तानला बाध्य करण्यात आले आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाच्या दुसर्या टप्प्याचे जोरदार आयोजन केल्यानंतर बीसीसीआय आता दुसर्या मोठा स्पर्धेचे आयोजन करत आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन पाच वर्षांनंतर होणार आहे. आयोजनाची जबाबदारी भारताला देण्यात आली आहे. स्पर्धा भारतात नव्हे, तर ती यूएई आणि ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. परंतु बीसीसीआयकडे आयोजनाची जबाबदारी आहे.
स्पर्धेचे आयोजन भारताकडून केले जात असल्यामुळे प्रत्येक क्रिकेट संघाच्या जर्सीवर ICC Men’s T20 World Cup India असे लिहिण्यात आले आहे. तत्पूर्वी आधीच्या पाकिस्तानी जर्सीवर इंडिया असे लिहिण्यात आलेले नव्हते. बीसीसीआयने आक्षेप घेतल्यानंतर पाकिस्तानला इंडिया असे लिहावे लागले.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाही. आयसीसी स्पर्धेतच दोन्ही देश आमनेसामने येतात. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी २४ ऑक्टोबरला होणार आहे. आतापर्यंत आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत कधीही पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. एकदिवसीय असो अथवा टी-ट्वेंटी दोन्ही स्पर्धेत भारताचे पारडे आतापर्यंत जड राहिले आहे.
https://twitter.com/cricketpakcompk/status/1449046915509886981